ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिवसेनेतील प्रवेशानंतर खा. देशमुख झाले सक्रीय:दिग्रसमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाले ऐतिहासिक स्वागत‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर, खासदार संजय देशमुख यांचे प्रथमच दिग्रस शहरात आगमन झाले. याप्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता. मतदारसंघाच्या प्रगतीला आणि लोकविकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचे दिग्रसकरांनी अत्यंत उत्साहात आणि भव्य रॅली काढून स्वागत केले. मुंबईहून परतल्यानंतर खासदार संजय देशमुख यांचा वाहनताफा रविवारी रात्री सुमारे १०.३० वाजता आर्णी नाका परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि डीजेच्या तालावर नृत्य करत उत्स्फूर्त स्वागत केले. समर्थकांनी पुष्पहारांचा वर्षाव करत खासदार देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर खासदार संजय देशमुख हे खुल्या वाहनात उभे राहून कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत आर्णी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान भव्य वाहन रॅलीत सहभागी झाले. मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी वाहन थांबवून खासदार देशमुख यांच्या गळ्यात पुष्पहार घालत त्यांचे जंगी स्वागत केले. भर पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत स्वीकारल्यानंतर खासदार देशमुख चिंचोली येथील निवासस्थानी रवाना झाले. तेथे त्यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. निवासस्थानी उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान, खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस आगमनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून उबाठा शिवसेना गटाचे पूनम पटेल, दिग्रस शहरप्रमुख राहुल देशपांडे, शेखर चांदेकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. जनतेच्या विकासासाठी घेतलेला निर्णय जनतेच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आणि माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भगव्या ध्वजाखाली नवी जबाबदारी स्वीकारली आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि साथ हेच माझे बळ असून, जनसेवेसाठी मी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कार्यरत राहीन. – संजय देशमुख, खासदार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर