ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सलग यशस्वी कारवाईनंतर दिग्रस पोलिसांचा केला गौरव:उपनिरीक्षक किशोर मुरकुटे यांना सहकारी आणि मित्रांनी दिला निरोप‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अवघ्या २० तासांत तीन अपहरण प्रकरणांचा यशस्वी छडा लावत पीडित मुलींना सुरक्षित ताब्यात घेणे तसेच वाशीम जिल्ह्यातून आणखी एका अल्पवयीन पीडित मुलगी व आरोपीला ताब्यात घेण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिग्रस पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात महागाव पोलिस स्टेशन येथे बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे यांना निरोप देण्यात आला. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक महेश देशमुख, किशोर मुरकुटे, पोलीस अंमलदार देवा फलटणकर आणि पोलिस कॉन्स्टेबल अभय इंगोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अल्पावधीत अनेक अपहरण प्रकरणांचा छडा लावत पीडित मुलींना सुरक्षित परत आणण्यात या पथकाने बजावलेल्या भूमिकेची उपस्थितांनी प्रशंसा केली. दिग्रस येथून महागाव पोलीस स्टेशन येथे बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे यांना सहकाऱ्यांनी निरोप दिला. त्यांच्या सेवाकाळातील कार्याचा गौरव करत पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी केले. यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करत किशोर मुरकुटे यांच्या कार्याचा गौरव केला तसेच एकत्रितपणे केलेल्या तपास, शोधमोहीमा आणि संघभावनेच्या आठवणींना उजाळा दिला. उपनिरीक्षक किशोर मुरकुटे यांनीही मनोगतात दिग्रस येथे मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि पुढील सेवेतही याच निष्ठेने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. १३ जून रोजी दिग्रस पोलिस स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमाला पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान आणि बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला दिलेला स्नेहपूर्ण निरोप यामुळे दिग्रस पोलिस दलातील सहकार्य, समर्पण आणि संघभावना अधोरेखित झाल्याचे यावेळी दिसून आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर