ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हीच खरी संस्कृती- न्यायाधीश दीपक दाभाडे:ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असतात. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वृद्धांवर अन्याय अथवा छळ होत असल्यास कायद्यात त्यांच्यासाठी सक्षम संरक्षणाची तरतूद असून न्यायव्यवस्था त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश दीपक दाभाडे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक एस. डी. वानखडे, अधिवक्ता सोनाली भोयर, मंडळाचे अध्यक्ष राजन टोंगो, संस्थापक अध्यक्ष बळवंतराव चिंतावार, उपाध्यक्ष विनोद सहस्रबुद्धे, सचिव पांडुरंग ढुमणे आणि प्रकल्प प्रमुख प्रल्हाद हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर अध्यक्ष राजन टोंगो यांनी प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. प्रत्येक पोलिस ठाण्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सल्लागार कक्ष स्थापन करून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढवण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. अधिवक्ता सोनाली भोयर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देताना कौटुंबिक छळ प्रतिबंधक कायदा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर पोलीस निरीक्षक एस. डी. वानखडे यांनी ज्येष्ठांच्या तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती देत, आपत्कालीन परिस्थितीत ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने पोलीस मदत उपलब्ध होईल, असे सांगितले. यावेळी लोकतंत्र सेनानी लक्ष्मण खत्री यांनी ज्येष्ठांच्या समस्या मांडल्या, तर साधना बंडेवार यांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमात ज्येष्ठांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी समाजाने संवेदनशील भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन बळवंतराव चिंतावार यांनी केले. संचालन विजय विसपुते यांनी तर आभार प्रदर्शन पांडुरंग ढुमणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वासुदेव कांबळे, चित्रा देशपांडे, कृष्णा तपके यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी अन्याय, दुर्लक्ष किंवा छळ सहन न करता कायदेशीर मदतीचा आधार घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले. विधी सेवा प्राधिकरण, पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्था ज्येष्ठांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर