ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ सापडला ड्रग्सचा साठा:सुषमा अंधारेंचा दावा; ‘षड्यंत्र’ म्हणत प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टजवळ असलेल्या शेडवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड्रग्सची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. तसेच पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली पण ड्रग्सशी संबंधित ज्या तीन लोकांची नावे एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नसल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टच्या जवळ असलेल्या शेडवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भातील माहिती लपवून ठेवली होती. तसेच आता एखाद्या प्रकरणात पोराचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्स प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच यानंतर मला काहीही झाले तर आज ज्यांची नावे मी घेतली ते लोक जबाबदार असतील, असेही त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर सक्तीचे राजकारण बाजूला ठेऊन ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला आशा आहे. उके नावाच्या वकिलाने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, नवाब मलिक यांनी देखील काही मुद्दे समोर आणले होते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले होते हे सर्वांना माहीत आहे. सुषमा अंधारे यांनी आरोप केलेले प्रकरण नेमके काय? सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 13 डिसेंबर रोजी सावरी गावात कारवाई झाली. सुरवातीला मुकंद गावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले. यात विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरी गावात जाऊन आले आणि मला काही धक्कादायक माहिती मिळाली. या ठिकाणी कोयनेचे बॅकवॉटर आहे. इथे स्विमिंग टँक तयार होत आहेत. रिसॉर्ट होत आहे. इथून जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. इथे गाव नाही, माणूस नाही तरी इथे शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? इथल्या रिसॉर्टमध्ये सात ते आठ रूम बांधून तयार आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक सुविधा आहेत. याठिकाणी एक डस्टर गाडी आहे. पोलिसांनी या रिसॉर्टमध्ये केलेल्या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले. याची किंमत 145 कोटी आहे. ही बातमी फार चर्चेत आली नाही. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. या शेडचा मालक गोविंद सिंदकर आहे. याच्या शेडची चावी ओंकार दिघे याने घेतली अशी माहिती गोविंद याने दिली. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले. पोलिसांनी त्याला का सोडले हे अजून माहीत नाही. मुंबई पोलिस त्या ठिकाणी का गेले? असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, रणजीत शिंदे हा एकनाथ शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे. एकनाथ शिंदे ज्या गावाचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी समोर आल्या. रणजीत शिंदे कुठे आहे? त्याचे नेमके काय झाले? रणजीत शिंदे याने हे हॉटेल का चालवावे, त्याचा काय संबंध? प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. ठाण्यातून 2017 आली त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी की, या ठिकाणी तीन जण राहत होते. आसाम राज्यातून त्यांना या ठिकाणी कुणी आणले असेल? यातले काही बांगलादेशी आहेत असेही म्हटले जाते? हे तीन रिसॉर्टमध्ये कसले काम करत होते? तसेच एसपी तुषार दोशी यांनी यासंदर्भातील माहिती लपवल्याचा आरोप अंधारे यांनी केला. तीन जणांची नावे पोलिसांच्या एफआयआरमध्ये का नाहीत? स्थानिक लोकांनी सांगितले की, ही लोक भारतीय नसावीत. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसत होती. या तीन लोकांना जेवण प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जात होते. या तीन कामगारांना या पंचतारांकित हॉटेलमधील जेवण कसे परवडत होते? अर्थात ही माहिती पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. या तीन जणांची नावे पोलिसांच्या एफआयआरमध्ये का नाहीत? एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही, एफआयआर अशी लपवता येत नाही. सरकारशी संबंधित जेव्हा एफआयआर असतात तेव्हा त्या लपवल्या जातात. जे हॉटेल आहे की रिसॉर्ट? याचे नाव हॉटेल तेजयश आहे. हे तेज आणि यश प्रकाश शिंदे यांची मुले आहेत, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली. हे विरोधकांचे षड्यंत्र – प्रकाश शिंदे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला बोलताना ते म्हणाले, सुषमा अंधारे यांचे आरोप साफ खोटे आहेत, हे विरोधकांचे षड्यंत्र आहे. ज्या स्पॉटवर हे ड्रग्स सापडले आहेत, तिथून तीन ते साडे तीन किमी लांब ती जागा आहे. पोलिसांच्या अहवालानुसार सर्वांनी माहिती घ्यावी. माझ्या जागेशी त्या घटनेचा काहीही संबंध नाही. तो माझा रिसॉर्ट नसून गेल्या 6 महिन्यांपूर्वी रणजीत शिंदे यांना ती जागा दिलेली आहे. तसेच, तिथे रिसॉर्ट नसून ती केवळ जागा आहे. साताऱ्याच्या एसपींना मी कधी बघितले नाही, किंवा त्या एसपींनी देखील मला कधी बघितलेले नाही, असेही शिंदेंनी स्पष्ट केले. पुढे बोलताना प्रकाश शिंदे म्हणाले, मी नगरसेवक म्हणून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देत राहतो. पोलिसांनी धाड मारली हे चांगले आहे. पोलिस तपासात सगळे समोर आले, जे ड्रग्ज सापडले त्यानुसार कारवाई केली पाहिजे. मात्र, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि राजकीय षडयंत्र असल्याचे प्रकाश शिंदे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर