ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक:योजना स्थगित करण्याची मागणी, वाढीव वीजबिलांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात महावितरणमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना अवाजवी वाढीव वीजबिले आणि थकीत दंडाचा नाहक सामना करावा लागत आहे. राज्यातील जनतेची होत असलेली ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्मार्ट मीटर योजनेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून जनतेच्या रोषाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. वीज वितरण यंत्रणेच्या त्रुटींचा बोजा ग्राहकांवर का? मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर गंभीर बोट ठेवले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यापासून पूर्वीच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा वीजबिले येत असून, मंजूर वीजभारापेक्षा अधिक वापर झाल्याचा दावा करत ग्राहकांवर मागील कालावधीचा मोठा दंड लादला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जुन्या मीटरमधील तांत्रिक त्रुटी किंवा संथ नोंदणीची शिक्षा सर्वसामान्य ग्राहकांना देणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. वीज वितरण यंत्रणेतील स्वतःच्या चुकांचा आर्थिक बोजा महावितरण ग्राहकांच्या खिशावर टाकत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. गोव्याच्या धर्तीवर निर्णय घ्या- पाटील
जयंत पाटील यांनी पत्रात शेजारील गोवा सरकारचा दाखला दिला आहे. गोवा सरकारने स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेत या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे आणि वाढीव बिलांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला स्थगिती देऊन आतापर्यंत आकारण्यात आलेल्या वाढीव बिलांची आणि दंडाची स्वतंत्र चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत दंड आकारणी थांबवावी आणि कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी आग्रही मागणी जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. जयंत पाटलांचे पत्र… मान्सून ‘बेपत्ता’: उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांत भारतावरील ढग गायब, देशात 4 ते 15 जूनदरम्यान 64% कमी पावसाची नोंद देशातील एका मोठ्या भागाच्या सॅटेलाइट छायाचित्रांमधून नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ढग गायब होऊ लागले आहेत. त्याच वेळी, दक्षिण आणि मध्य भारताच्या अनेक भागांत मान्सून दाखल झाला असला तरी देशातील मोठ्या भूभागावर पावसात मोठी घट नोंदवली गेली आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 4 ते 15 जूनदरम्यान देशात केवळ 19.2 मिमी पाऊस झाला आहे. तर या कालावधीसाठी सरासरी पाऊस 53.7 मिमी मानला जातो. म्हणजेच, देशभरात आतापर्यंत 64% कमी पावसाची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर