ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अमोल मिटकरी विदूषक अन् फुटकळ आमदार:त्यांची ग्रामपंचायही निवडून आणण्याची लायकी नाही, प्रशांत जगताप यांनी काढली लायकी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगपात यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची अक्षरशः लायकी काढली आहे. मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक व फुटकळ आमदाराच्या विधानावर मी भाष्य करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी वाटाघाटी सुरू आहेत. त्याला विरोध म्हणून प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता प्रशांत जगताप यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरींची ग्रामपंचायतही निवडून आणण्याची लायकी नाही मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक व फुटकळ आमदाराच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. ज्यांची ग्रामपंचायत ही निवडून येण्याची लायकी नाही, त्यांच्यावर मी काय बोलावे? अमोल मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी व फुटकळ नेते आहेत. जे लोकांतून निवडून आले असतील, त्यांनी माझ्याशी बोलावे, असे प्रशांत जगताप यांनी आमदार अमोल मिटकरी यांचा खरपूस समाचार घेताना म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते अमोल मिटकरी? प्रशांत जगपात यांच्या राजीनाम्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी त्यांना स्वतःची खुमखुमी दाखवण्यासाठी स्वतःचा पक्ष काढण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय. मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार, अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा. पुण्याचा भावी “खाज”दार, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा… दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते:ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने मांडले मतांचे गणित; वाचा काय आहे मतांचे समीकरण? मनसे व ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली. यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचे गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर