ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात पडेल, गोठ्यात हात घालू नका, गोरक्षकांना शेतकरी वैतागला आहे, शेणा मुतातले हात रस्त्यावर लढायला मागे पुढे बघणार नाहीत, असा इशारा आ. सदाभाऊ खोत यांनी दिला. शिरभावी ( ता. सांगोला ) येथील शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातून खरेदी करून वाहनातून आणलेले बैल पंढरपूरच्या गो रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. तसेच त्या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या ताब्यात चारा, पाण्याशिवाय असलेल्या जनावरांची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि सरकारवर कडक ताशेरे ओढले. यावेळी पुढे बोलताना आ. खोत म्हणाले कि, शेतकरी पिढ्यान पिढ्या जनावरे पाळतो, आम्हाला जेवढी गरज आहे तेवढी जनावरे गोठ्यात ठेवतो, आणि गरज नसेल ती विकतो. सरकारला जनावरे सांभाळायची एवढी हौस आली आहे तर सरकारने गावात येऊन जनावरे खरेदी करावी, शेतकऱ्याने जनावरे विकायची नाहीत तर जनावरे खरेदी विक्रीसाठी दुकाने टाकावीत, सरकारच्या आश्रयाशिवाय हे चालते का, सरकार हे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या बाजूने आहे. या सरकार समोर मी हात टेकले, हतबल झालोय, या सरकारला कळत नाही. सरकारला शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र का कळत नाही, असा सवाल व्यक्त केले. मी आता विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे, पांडुरंगाला साकडे घालणार आहे, पांडुरंग, दह्या, दुधाने भरलेला आमचा गोठा संकटात आलेला आहे, आता तूच सरकारला सुबुद्धी दे असे पांडुरंगाला साकडे घालणार आहे. सरकारला सुबुद्धी दे, पांडुरंगाला साकडे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर