ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

कयाधू नदी घेणार मोकळा श्वास!:5 लाख घनमीटर गाळ काढण्यास सुरुवात; 50 कोटी लीटर पाणी साठणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मृद व जल संधारण विभागाच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ता. 21 जून पर्यंत तब्बल 5 लाख घनमीटर गाळ काढण्याचे प्रयत्न आहेत. यातून तब्बल 50 कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेती सिंचनासोबत भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पात्र उथळ व अरुंद असल्यामुळे नदीमध्ये पावसाचे पाणी पडल्यानंतर वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापासूनच नदीचे पाणी कमी होण्यास सुरूवात होते. तर जानेवारी महिन्यात नदी कोरडीठाक पडते. त्यामुळे ही नदीच आहे काय? असा प्रश्‍न उभा राहतो. नदीचे पाणी आटल्यामुळे त्याचा परिणाम भुगर्भातील पाणी पातळीवर होत असून नदी असूनही परिसरातील भुगर्भातील पाणी पातळी खोल जात असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी विंधन विहीरीचा उपायोग होत नाही. दरम्यान, कयाधू नदीवर बंधारे घेण्याची मागणी सातत्याने होऊ लागली आहे. त्यानुसार शासकीय पातळीवर हालचाली देखील सुरु आहेत. तर दुसरीकडे हिंगोली शहरालगत तीन किलो मीटर अंतरापर्यंत नदीचे पात्र रुंद व खोल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता व्ही. एन. निर्वळ यांच्यासह नदी पात्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवाय योजनेतून नदीतील गाळ काढणे व खोलीकरण करण्याचे काम करण्याचे ठरविण्यात आले. या कामाला सध्या गतीने सुरुवात झाली असून सहा जेसीबी द्वारे गाळ काढला जात आहे. तसेच नदीपात्राचे 1 ते दोन मीटर पर्यंत खोलीकरण केले जाणार आहे. दरम्यान, पाऊस सुरु होईपर्यंत हे काम सुरु राहणार असून ता. 21 जून पर्यंत तब्बल 5 लाख घनमीटर गाळ काढण्याचे उदिष्ट आहे. त्यानुसार युध्दपातळीवर काम सुरु झाले आहे. गाळ काढणे व खोलीकरणामुळे नदीमध्ये पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार असून हा पाणीसाठा साधारणतः जानेवारीपर्यंत कायम राहिल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. या नदीत पाणीसाठा झाल्यामुळे परिसरातील शेती सिंचनाखाली येणार आहे. या शिवाय भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असून त्यामुळे नदीकाठावरील विंधन विहीरींना उन्हाळ्यात देखील पाणी राहण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना गाळ घेऊन जा मृद व जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता व्ही. एन. निर्मळ म्हणाले की, कयाधू नदीचे सुमारे तीन किलो मिटरचे पात्र रुंद करून खोलीकरण केले जाणार आहे. दोन टप्यात हे काम सुरु आहे. नदीतून वाळू उपसा केला जाणार नसून केवळ गाळ उपसा केला जात आहे. शेतकऱ्यांनी गाळ नेऊन शेतात टाकल्यास जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर