ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पुणे विधान परिषदेत विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी:पार्थ पवारांच्या आग्रहामुळे निष्ठावंत इच्छुक नाराज

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या उमेदवारीसाठी खासदार पार्थ पवार यांनी विशेष प्रयत्न केले, ज्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत इच्छुक नाराज झाले आहेत. रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे कार्यालयात उमेदवारी निश्चितीसाठी एक मॅरेथॉन बैठक झाली. रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली ही बैठक पहाटे दीड वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल पाच तास चालली. या बैठकीत उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्यावर ठाम होते. महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. मात्र, उमेदवार कोण असावा, यावर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. अखेर, खासदार पार्थ पवार यांच्या आग्रहामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मित्र मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक कामात किंवा कठीण काळात त्यांचे योगदान किती होते, याबाबत पक्षातच काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या जागेसाठी अजित पवार गटातील अनेक इच्छुक नेते प्रयत्नशील होते. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. टिंगरे हे महायुतीचे सक्षम उमेदवार ठरू शकतील, असा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने निष्ठावंत इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरले. विक्रम काकडे हे मूळचे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे मूळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून भाजपशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘पक्षात अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी मिळत नसेल आणि नेत्यांचे मित्र थेट तिकिटे पटकावत असतील, तर कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करायचे?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पार्थ पवार यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर