ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

भंडारा-गोंदियात राजकीय भूकंप:नाना पटोलेंना धक्का; लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात सामील

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत लाखांदूर नगरपंचायतीमधील चार काँग्रेस नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवसाआधी घडलेल्या या घडामोडीमुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे. या राजकीय उलथापालथीमागे भाजपचे विधान परिषद आमदार डॉ. परिणय फुके आणि लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांची रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. नाना पटोले यांचे खंदे समर्थक आणि लाखांदूर नगरपंचायतीवर सलग दुसऱ्यांदा स्वीकृत नगरसेवक असलेले मुकेश उर्फ बंटी सहजानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या तीन विद्यमान महिला नगरसेविका निशा जगदीश बगमारे, लोभा बाळू शिलार आणि लता प्रमोद कुडेगावे यांनीही आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला आणखी एक धक्का दिला. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील यंदाची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजपने येथे अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे. ब्राह्मणकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघात नाना पटोले यांना केवळ २०८ मतांच्या फरकाने कडवी झुंज दिली होती. त्यांची हीच वाढती ताकद पाहून पक्षाने त्यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे सुपुत्र प्रफुल्ल अग्रवाल यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मागील निवडणुकीत प्रफुल्ल अग्रवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हा मतदारसंघ नाना पटोले यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचाही बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मतदानाचा हक्क असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाच आपल्या गोटात ओढून भाजपने महाविकास आघाडीला बॅकफूटवर आणले आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर लाखांदूर नगरपंचायतीमधील काँग्रेसचे संख्याबळ घटल्यामुळे, याचा थेट फटका काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोले यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लागलेला हा सुरुंग आगामी निवडणुकीचा निकाल बदलणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर