ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

चारधाम यात्रा:मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; बहीण खासदार प्रीतम यांच्यासह आई प्रज्ञा मुंडे सोबत PHOTO

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवार, 12 जून रोजी गुजरातमध्ये श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई प्रज्ञाताई मुंडे आणि बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली. तसेच चारधाम यात्रेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. आईने केला होता संकल्प मंत्री पंकजा मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालम्ॐ कारममलेश्वरम्…’ गुजरातमध्ये वेरावळजवळ प्रभास पाटन येथे असलेले सोमनाथ मंदिर हे केवळ एक पूजास्थान नसून, भारताच्या सांस्कृतिक सातत्याचे एक जिवंत प्रतीक आहे. आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या औचित्याने आज या भक्तिमय प्रवासादरम्यान श्री. सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे अत्यंत भक्तीभावाने दर्शन आणि अभिषेक करण्याचे भाग्य लाभले. या पवित्र प्रसंगी आई प्रज्ञाताई मुंडे आणि बहीण मा.खा.डॉ.प्रीतमताई मुंडे सोबत होत्या.’ यावेळी प्रज्ञा मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुली पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यासह सोमनाथाला अभिषेकही केला. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात प्रभास पाटण (वेरावळजवळ) येथे वसलेले श्री सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या मंदिराचा इतिहास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. सोमनाथ नाव कसे पडले? हिंदू पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने (सोम) दक्ष प्रजापतीच्या शापामुळे आपले तेज गमावले होते. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी सरस्वती, हिरण्य आणि कपिला या तीन नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन चंद्राला शापमुक्त केले. त्यानंतर चंद्राच्या विनंतीवरून भगवान शिवाने येथे ‘सोमनाथ’ (चंद्राचा स्वामी) म्हणून निवास केला. असे मानले जाते की, इतिहासकाळात पहिले मंदिर स्वतः चंद्रदेवाने सोन्याचे, दुसरे रावणाने चांदीचे, तिसरे श्रीकृष्णाने लाकडाचे आणि चौथे राजा भीमदेवाने दगडाचे बांधले होते. इतिहास: आक्रमणे आणि पुनरुत्थानाचे अमर प्रतीक मंदिर रचना आणि अद्वितीय वैशिष्ट्ये यात्रेकरूंसाठी महत्त्वाची आणि व्यावहारिक माहिती सुरक्षा आणि सतर्कता आवाहन

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर