ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

नाशिकमध्ये परतताच राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत:म्हणाले- 100 कोटींच्या ऑफरची चर्चा, पण मी विचारांशी प्रामाणिक राहिलो; शिवसैनिकांनी केली पुष्पवृष्टी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू असताना, राजाभाऊ वाजे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘मी ज्या विचारधारेतून निवडून आलो, त्याच्याशी प्रामाणिक आहे’ नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “ज्या विचारधारेतून मी निवडून आलो, त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. मी घेतलेला निर्णय योग्य आहे, याचीच ही पावती आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे.” वाजे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांचे प्रेम आणखी वाढल्याची भावना व्यक्त केली. ‘मला ऑफर मिळाली नाही; मला पाहिजे ते आधीच मिळालं आहे’ गेल्या काही दिवसांपासून बंडखोर खासदारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देण्यात आल्याच्या चर्चांवरही वाजे यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. “मला ऑफर मिळाली नव्हती. मला पाहिजे ते मला मिळत आहे आणि ते माझ्यासाठी खूप आहे.” असे सांगत त्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडल्याचा संदेश दिला. ‘वाजे कुटुंबाने निष्ठा राखली’ दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दावा केला होता की काही खासदारांना मोठ्या आर्थिक ऑफर्स तसेच विकासकामांची आश्वासने देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर राजाभाऊ वाजे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, वाजे कुटुंबाने कोणत्याही दबावाला किंवा राजकीय प्रस्तावांना बळी न पडता आपली भूमिका कायम ठेवल्याचे ठाकरे गटाकडून सांगितले जात आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत झाले होते भावुक सहा खासदारांच्या बंडानंतर दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे नाते याविषयी भावनिक भाषण केले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांच्याही भावना अनावर झाल्याचे दिसून आले होते. पक्षावर आलेले संकट, सहकाऱ्यांची फूट आणि कार्यकर्त्यांची भावना यांचा उल्लेख होत असताना वाजे यांना अश्रू अनावर झाल्याचे दृश्य चर्चेत आले होते. ठाकरे गटासाठी ‘निष्ठेचे प्रतीक’ बनले वाजे? सध्या शिवसेना (उबाठा)मध्ये सुरू असलेल्या मोठ्या राजकीय संकटात राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटासोबत ठामपणे उभे राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकमध्ये झालेल्या त्यांच्या स्वागताकडे केवळ एका खासदाराच्या आगमनापेक्षा अधिक, तर ठाकरे गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. दरम्यान, सहा बंडखोर खासदारांची पुढील भूमिका, लोकसभा अध्यक्षांकडे दिलेल्या पत्रावरील निर्णय आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंना मिळालेला प्रतिसाद ठाकरे गटासाठी काहीसा दिलासादायक मानला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर