ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

जीवनविकास विद्यालयाची चमू चमकली तालुकास्तरावर.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

14 वर्षाखालील वयोगटात मिळवले यश.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये हटवांजरी येथील जीवनविकास माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांच्यातसेच मुलींच्या 14 वर्षे वयोगटामध्ये विजेतेपद पटकावले.त्यामुळे या संघावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे दि.20 सप्टेंबर पासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना सुरवात झाली.विद्यार्थ्यांना शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही मिळावे या उद्देशाने नवरगाव येथे क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे. खेळ खेळल्याने मनुष्यामध्ये धैर्य,सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो.

तालुका क्रीडा संयोजक बंडू काकडे सर व मुख्याध्यापक सुधाकर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरगाव येथे सामन्यांना सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन ए.पी. विराणी,कार्यकारी अध्यक्ष,पंचशील विद्यालय नवरगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेमध्ये जीवनविकास माध्य.व उच्च माध्य.विद्यालय, हटवांजरी विद्यालयाने कबड्डीमध्ये ( 14 वर्षे वयोगट ) मुलाच्या संघाने अंतिम सामन्यात पंचशील विद्यालयावर तर मुलीच्या संघाने अंतिम सामन्यात भारत विद्या मंदिर कुंभा संघावर मात करीत दोन्ही हटवांजरी च्या संघांनी तालुका स्तरीय विजेता ठरत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली.

विद्यार्थीवर्ग,क्रीडा शिक्षिका मोघे मॅडम व विद्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थाअध्यक्ष मा.कुंदनकुमार महाजन, सचिव सौ.स्वाती महाजन,क्रीडा सयोंजक बंडु काकडे सर व मुख्याध्यापक मुकेश महाडुळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर