ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रकल्प ग्रस्त महिलांचा दिंदोडा धरणावर मोर्चा

128 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव,

मारेगाव प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रकल्प ग्रस्त्त महिलांचा 12 मार्चला दिंदोडा धरणावर मोर्चा काढण्यात आला होता .दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात  आले होते. या मोर्चाचे निवेदन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांचे कडे देण्यात आले.

दिंदोडा प्रकल्प ग्रस्तावर झालेल्या अन्याया विरोधात हा महिलां मोर्चा तालुक्यातील सावंगी (संगम)येथे काढण्यात आला होता.प्रकल्प ग्रस्ताना वाढीव मोबदला मिळावा या मागणी साठी हे आंदोलन होते.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला शक्तीनी पुढाकार घेत हे आंदोलन केले.आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी विलास भोंगाडे यांची उपस्थिती होती.

या आंदोलनात प्रकल्प बाधित शेतकरी,शेतमजूर,मच्छिमार बांधवाचे सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा यशस्वीतेसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या महिलां सदस्यांनी प्रयत्न केले. अध्यक्ष पुंडलिक तिजारे,उपाध्यक्ष अभिजित मांडेकर,सचिव चंपत साळवे यांनी वाढीव मोबदला दिल्या शिवाय प्रकल्पाचे बांधकाम करुं नये असा इशारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

महिलां मोर्चाचे नेतृत्व सुजाता भोंगाडे,समीक्षा गणवीर यांनी केले यशस्वीतेसाठी मंजुषा लडके,जयश्री पिसे,सविता खाडे,मायाताई भोयर,ज्योती भोयर,कल्पना काळे,विद्या तिजारे,शालू डहाके,सोनाली वरवाडे,शालू देवाडे यांनी केले, सूत्रसंचालन ,मंगला ठाकरे यांनी केले.यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड,तसेच अभियंता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर