ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

मकोका प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण कुर्वे गजाआड:दीड वर्षांनंतर मानकापूर पोलिसांनी सिन्नरमधून केली अटक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात आरोपी प्रवीण बाळकृष्ण कुर्वे याला मानकापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणाची पार्श्वभूमी ३ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. गोधणी रोडवरील साप्ताहिक बाजार परिसरात सोहेल खान याच्यावर पिस्तूल आणि चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात सोहेलचा मित्र मोहम्मद सुलतान हा देखील गंभीर जखमी झाला होता. जमिनीच्या जुन्या वादातून हा पूर्वनियोजित कट रचून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी भूषण उर्फ बाल्या बहाड, गजेंद्र मरकाम, धीरज घोडमारे, चंदू डोंगरे आणि अंकित उसरबरसे यांच्यासह मुख्य संशयितांना यापूर्वीच अटक केली होती. मात्र, घटनेनंतर प्रवीण कुर्वे हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता आणि पोलीस मागील दीड वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. मानकापूर पोलिसांच्या पथकाला आरोपी कुर्वे हा नाशिकच्या सिन्नर परिसरात नाव बदलून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सिन्नर येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. नागपुरात आणून केलेल्या कसून चौकशीत त्याचा या हत्याकांडात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर आणि त्यांच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या अटकेमुळे मकोका गुन्ह्यातील सर्व कड्या जोडण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर