ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू खरात गुन्हेगार अन् महत्त्वाचा साक्षीदार:त्याची कोठडीतच हत्या होण्याची दाट शक्यता, वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली भीती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने भोंदू अशोक खरातच्या जिवाला पोलिस कोठडीत मोठा धोका असल्याचा संशय व्यक्त केला आहे. भोंदू अशोक खरात गुन्हेगारच नाही, तर या प्रकरणातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. या प्रकरणात गुंतलेले लोक पाहता त्याच्या जिवाला कोठडीत मोठा धोका आहे. त्यामुळे त्याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्याची गरज आहे, असे वंचितने म्हटले आहे. अशोक खरातवर नाशिक व परिसरातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्याशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोग व नंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने अशोक खरातच्या जीवितास पोलिस कोठडीतच मोठा धोका असल्याचा संशय व्यक्त करत त्याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत हलवण्याची मागणी केली आहे. आतापर्यंतची माहिती हिमनगाचे एक टोक वंचितने शनिवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणातील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आतापर्यंत जगाने जे पाहिले आहे, ते केवळ हिमनगाचे टोक आहे. वंचित बहुजन आघाडीला असे समजले आहे की, अनेक मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय, प्रशासनातील नोकरशहा यांच्यासह अनेक प्रभावशाली व्यक्तींचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. अशोक खरात केवळ गुन्हेगारच नाही, तर या घोटाळ्यातील एक महत्त्वाचा साक्षीदारसुद्धा आहे. त्याला गप्प करण्यासाठी आणि या प्रकरणात गुंतलेल्या अत्यंत महत्त्वाच्या नावांची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी, कोठडीतच त्याची हत्या होण्याची दाट शक्यता आहे. त्याला उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे वंचिने म्हटले आहे.

खरात विरोधात 100 हून अधिक तक्रारी दुसरीकडे, अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करून त्यावर पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत 100 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील 70 टक्के तक्रारी या महिलांच्या आहेत. या तक्रारी केवळ हेल्पलाईनवर प्राप्त झाल्या आहेत. पण तक्रार करणाऱ्यांपैकी बहुतांश जणांनी प्रत्यक्ष लेखी तक्रार देण्यास उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे एसआयटीकडून तक्रारदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकाटेंचे मंत्रिपद कापण्यासाठी खरातचा तटकरेंना फोन राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. या प्रकरणी त्यांनी कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे. पुढे वाचा भोंदू खरात विरोधात आणखी 2 गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातवर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा, तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात खरातने पीडित महिलेवर आपल्या मोडस ऑपरेंडीनुसार म्हणजे आपण दैवी अवतार असल्याचे सांगत अत्याचार केला. ही महिला आपल्या नवऱ्यासोबत संसार सुखाचा व्हावा म्हणून खरातकडे आली होती. पण त्याने तिच्यावरच अत्याचार करून आपला कामवासना भागवली. पुढे वाचा हे ही वाचा… भोंदू बाबा ऋषीकेश वैद्यला अटक:पुणे पोलिसांनी पिंपरीत ठोकल्या बेड्या; ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर केला होता बलात्कार

अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर