ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सांस्कृतिक:जगन्नाथ रथयात्रा, रासलीला, बिहू नृत्य, गरबा,भांगडा, घुमर, झुमर नृत्यातून दिसली विविध राज्यांची संस्कृती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


या स्नेहसंमेलनात ओरिसाची जगन्नाथ रथयात्रा, कश्मीरचे ऑपरेशन सिंदूर, गोव्याचे फॉगडी, पश्चिम बंगालचे नृत्य, उत्तर प्रदेश मधील रासलीला, आसामचे बिहू नृत्य, गुजरातचा गरबा, दक्षिण भारतातील बोनालू नृत्य, पंजाबचा भांगडा, महाराष्ट्रातील गोंधळ, वारी. राजस्थानचे घुमर, हरियाणाचे झुमर नृत्य इत्यादी विविध राज्यांची विशेषता व संस्कृती विद्यार्थ्यांनी नृत्यातून दाखवली. निमित्त होते श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामअवतार मानधना या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे. श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे वार्षिक स्नेहसंमेलन विविधतेत एकता आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित होते. हा कार्यक्रम केवळ मनोरंजक न राहता सांस्कृतिक समन्वयाचे केंद्र बनला. विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या कला,वेशभूषा आणि परंपरांचे दर्शन घडवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी श्रीगोपाल धूत हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वसंत बंग उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर यांनी केले. अध्यक्ष धूत यांचा सत्कार संस्थेचे सचिव डॉ.शरद कोलते यांनी केला. डॉ.वसंत बंग म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात असलेले प्रश्न विचारू द्या त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. मुले पालकांच्या अनुकरणातूनच शिक्षण घेत असतात. पालकांच्या वागण्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर होत असतो. या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रातही अग्रेसर आहेत . याचे त्यांनी विशेष कौतुक केले. श्रीगोपाल धूत यांनी पारितोषिके मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या राधिका जेऊरकर यांनी वर्षभरात झालेल्या उपक्रमांचे आणि शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे वार्षिक अहवाल वाचन केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे होते की विद्यालयातील विद्यार्थिनींनीच गाणी म्हणून त्यावर नृत्य सादर केली, त्यात गणेश वंदना, पंढरीची वारी, बालगीते, नाट्यगीत, कोळीगीत इत्यादी प्रकार सादर करण्यात आले. या कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका पुष्पा औटी व शेखर दरवडे यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्या गगन वाधवा यांनी करून दिला. अध्यक्ष धूत यांचा परिचय कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संपदा देशपांडे यांनी करून दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. हिंदी भाषेतील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हिंदी शिक्षिका सौ रोथेल लोंढे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सहसचिव बजरंग दरक, संस्थेचे विश्वस्त पुरुषोत्तम पटेल, श्रीगोपाल जाखोटिया, रामसुख मंत्री, अरुण झंवर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाच्या समन्वयक सुषमा उजागरे, श्रेयकुमार गुंडू, मौश्युमी लोंढे यांनी, तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश झंवर यांनी मानले. छावा नाटकाचे प्रभावी अन् यशस्वी सादरीकरण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या ऐतिहासिक नाटकाचे अत्यंत प्रभावी आणि यशस्वी सादरीकरण केले. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्यांचा त्याग आणि धर्मनिष्ठेचा संदेश देणारे हे नाटक पाहताना प्रेक्षक भारावून गेले. या स्नेहसंमेलनात विद्यालयातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर