ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम:29 शहरांत 2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात; कोणत्या ठिकाणी किती उमेदवार? वाचा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण २,८६९ नगरसेवक पदांसाठी आता १५,९३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे. राज्याची राजधानी मुंबईत २२७ जागांसाठी सर्वाधिक १,७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहरात १६५ जागांसाठी १,१६६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात तब्बल ९६८ उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उपराजधानी नागपुरात १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. माघारीचा ‘पुणे’ पॅटर्न; ८,८४० जणांची माघार पुण्यात निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला ३३,४२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २४,७७१ अर्ज वैध ठरले, तर ८,८४० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. माघार घेण्यामध्ये पुणे (९६८) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (५५२) आणि मुंबई (४५३) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी उमेदवार (२३०) इचलकरंजी महापालिकेत आहेत. बिनविरोध ७० जागा आणि कायदेशीर पेच राज्यात ७० जागांवर आधीच बिनविरोध निवडी झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निवडींना न्यायालयात आव्हान देता येईल का? याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. माघारीसाठी दबाव आणला गेला हे पुराव्याने सिद्ध करणे कठीण असले, तरी निवडणूक आयोगाची भूमिका यावर निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६: अधिकृत आकडेवारी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर