ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

वर्षभरापासून बेपत्ता असलेला “प्रकाश’ सुखरूप परतला घरी:हरवलेली आशा पुन्हा पल्लवित, वर्षभराच्या विरहानंतर धनदर कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एखाद्या आईच्या डोळ्यांतील अश्रू, बहिणीच्या मनातील प्रतीक्षा आणि कुटुंबाच्या हृदयातील वेदना शब्दांत मांडता येत नाहीत. मात्र, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “नंददीप फाउंडेशन’च्या अथक प्रयत्नांमुळे आज एक सुवर्णक्षण साकार झाला. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे गेल्या एक वर्षापासून घरापासून दूर भटकत असलेला प्रकाश बाबुराव धनदर अखेर आपल्या हक्काच्या घरात, कुटुंबीयांच्या कुशीत सुखरूप पोहोचला आहे. नंददीप फाउंडेशनने दाखवलेल्या माणुसकीच्या हातांमुळे धनदर कुटुंबाच्या अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा “प्रकाश’ पडला आहे. या भावनिक भेटीने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. नंदिनी शिंदे आणि संदीप शिंदे यांनी उभारलेल्या नंददीप फाउंडेशन संचलित बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा भावनिक पुनर्मिलाप शक्य झाला. प्रकाशला काही महिन्यांपूर्वी अत्यंत असहाय आणि भटक्या अवस्थेत घोडे या शिक्षकाला तो दिसला. त्यांनी प्रकाशला संस्थेच्या निवारा केंद्रात आणले होते. त्यावेळी त्याची मानसिक अवस्था गंभीर होती. त्याला स्वतःची ओळख होती, ना घराचा पत्ता माहिती होता. संस्थेने त्याला आश्रय, अन्न, वस्त्र आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर नियमित उपचार सुरू करण्यात आले. प्रेम, आपुलकी, संयम आणि सातत्यपूर्ण काळजीमुळे प्रकाश हळूहळू सावरू लागला. यानंतर नंददीप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्याची बहीण आणि कुटुंबीयांचा पत्ता शोधण्यात यश आले. तिरपुडे सोशल वर्क कॉलेज, नागपूरचे विद्यार्थी चेतन ठाकरे यांनी या पुनर्वसन मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत दि. ११ जून रोजी प्रकाश याला अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवनगाव (फ.) येथे त्याच्या बहिणीच्या स्वाधीन केले. भावाला पाहताच बहिणीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. कुटुंबीयांनी सांगितले की, “आमचा भाऊ एक वर्षापासून बेपत्ता होता. तो जिवंत असेल की नाही, याचीही आम्हाला खात्री उरली नव्हती. अनेक ठिकाणी शोध घेतला, पण काहीच माहिती मिळाली नाही. आज तो पुन्हा आमच्यासमोर उभा आहे, हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. नंददीप फाउंडेशन, चेतन ठाकरे यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. नंददीप फाउंडेशनचे कार्य केवळ बेघर मनोरुग्णांना निवारा देण्यापुरते मर्यादित नाही. त्यांना योग्य उपचार, सन्मानाचे जीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा नाते जोडून देण्याचे महान कार्य ही संस्था करत आहे. प्रकाशच्या पुनर्वसनासह संस्थेने आणखी एक यशस्वी कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले आहे. हरवलेल्या माणसाला पुन्हा त्याचे घर, त्याची माणसे आणि जगण्याची नवी उमेद मिळवून देणे, यापेक्षा मोठी सेवा कोणती असू शकते? प्रकाशच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू हेच नंददीप फाउंडेशनच्या कार्याचे खरे यश आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर