ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ड्रग्जविरोधातील मोहिमेला वेग‎:वणी येथील एमडी रॅकेटवर पोलिसांची कारवाई; एका आरोपीला केली अटक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील ड्रग्ज विक्रीविरोधातील मोहिमेला वेग देत पोलिसांनी एमडी रॅकेटमधील आणखी एका आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी एसपीएम हायस्कूल परिसरातून पकडलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून या टोळीतील तिसऱ्या सदस्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून एमडी, मोबाइलसह ६७,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना अटकेतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. गोपनीय माहितीच्या आधारे अक्षय उर्फ गोलू माधव पेचे वय २७ वर्ष, रा. वरोरा, जि. चंद्रपूर हा वणीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून ७.५४ ग्रॅम एमडी हस्तगत केले. जप्त अंमली पदार्थांची किंमत ५२,७८० रुपये असून, त्याच्याकडील अँड्रॉइड मोबाइलसह एकूण ६७,७८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण स्थानिक पातळीपुरते मर्यादित नसून, त्याचे धागेदोरे आंतरजिल्हा स्तरावरील ड्रग्ज पुरवठा साखळीशी जोडलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने चालत होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. शैक्षणिक परिसराच्या आसपास ड्रग्ज विक्रीचे उर्वरित. पान ४ अवघ्या काही दिवसांत एमडी ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सलग कारवायांमुळे वणी परिसरातील ड्रग्ज तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने तपास यंत्रणा पुढे सरकत असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर