ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

महाराणा प्रताप जयंती उत्साहात; शोभायात्रेने शहर दणाणले:उत्साह दुचाकी रॅली, शौर्य प्रदर्शन आणि समाजभूषण गौरव पुरस्कारांनी सोहळा लक्षवेधी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात सर्व राजपूत समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजपूत बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात दुचाकी रॅली, भव्य शोभायात्रा, शौर्यप्रदर्शने, समाजभूषण गौरव पुरस्कार वितरण यांमुळे उत्सवाला विशेष रंगत आली. जयंतीनिमित्त सकाळी शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप विश्व भारती स्कूल परिसरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान होते. व्यासपीठावर राजपूत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शैलेन्द्रसिंह बैस (दलवाला), करणी सेनेचे ललितसिंह परिहार, ईश्वरसिंह सेंगर उपस्थित होते. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राजपूत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शैलेन्द्रसिंह बैस (दलवाला), उपाध्यक्ष राजेंद्रसिंह गौतम, योगेशसिंह चौहान, रणधीरसिंह बिसेन, प्रदीपसिंह चंद्रवंशी, चंद्रकांतसिंह सोमवंशी, गुलाबसिंह चौहान, गोपालसिंह चौहान, भोलासिंह ठाकूर, विशालसिंह चौहान, सुरेशसिंह दीक्षित, अभिजीतसिंह रायकुंवर, भूपसिंह परिहार, बालासिंह सुरसवार, मोहनसिंह शेर, मोहनसिंह सोमवंशी, राजसिंह परिहार, कुणालसिंह, कपिलसिंह, सूरजसिंह, अंकित, शुभम, अथर्व सोमवंशी, शिव ठाकूर, संदीपसिंह, डॉ. सुनील परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समाजभूषण गौरव पुरस्काराने तज्ज्ञांचा गौरव कार्यक्रमात मागील ३५ वर्षांपासून समाजहितासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजबांधवांचा ‘समाजभूषण गौरव पुरस्कार’ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विजय राजेंद्रसिंह बैस आणि ऐश्वर्या चौहान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन शैलेन्द्रसिंह बैस यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रदीपसिंह चंद्रवंशी यांनी उपस्थितांना महाराणा प्रताप यांच्या विचारांवर चालत समाजातील एकजूट कायम राखण्याचा संकल्प दिला. पारंपारिक वेशभुषा ठरली लक्षवेधी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या भव्य शोभायात्रेत शेकडो समाजबांधव, महिला, युवक सहभागी झाले होते. शोभायात्रेतील घोडेस्वार पथक, बालकांनी सादर केलेली तलवारबाजी, लाठी-काठी, चक्रपट्टा प्रात्यक्षिके नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपरिक राजपूत वेशभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर