ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

रिकाम्या भूखंड स्वच्छतेची जबाबदारी मालकाची:दुर्लक्ष करणाऱ्यांवर होणार कारवाई, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निर्णय‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ शहरात कुठल्याही परिसरात तुमचा भूखंड असेल आणि तो रिकामा पडुन असेल तर आता त्या मोकळ्या भूखंडाची स्वच्छता तुम्हाला स्वत: करावी लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात नगरसेवक भारत ब्राम्हणकर यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असुन आता लवकरच या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खुल्या भूखंडांच्या स्वच्छतेची जबाबदारी भूखंड मालकावर निश्चीत करण्यात आली आहे. आरोग्यासाठी धोका अनेक मोकळ्या भूखंडामध्ये अशा घाण पाण्याचे डबके साचलेले पहायला मिळतात. इतकेच नव्हे तर अनेक भूखंडांवर झाडे, झुडपे वाढलेली असतात. यामध्ये वराहांचा संचार असतो. एकंदरीतच असे मोकळे भूखंड अस्वच्छता पसरण्यासाठी कारणीभुत ठरत आहे. असे असताना त्या भुखंडावर भूखंड धारकास रहायला जायचे नसल्याने तो देखील त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. ही बाब परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. स्वच्छतेचा खर्च व्याजासह वसुल करणे आवश्यक खुल्या भुखंडधारकांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी ठराविक कालावधीमध्ये भूखंडाची स्वच्छता करुन न घेतल्यास त्या भूखंडाची स्वच्छता पालिका प्रशासन करुन घेणार आहे. मात्र त्या कामासाठी येणारा खर्च व्याजासह संबंधीत भूखंड धारकाच्या मालमत्ता करामध्ये जोडुन वसुल करण्यात येणार आहे. त्यामुळे या बाबीकडे लक्ष न देणाऱ्यांना हा अतिरिक्त फटका सहन करावा लागणार आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारचे खुले भूखंड त्या भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारी ठरत असल्याने हा विषय सभेमध्ये मांडून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आता पालिकेने या नियमाची अंमलबजावणी सुरू करावा. भारत ब्राम्हणकर, नगरसेवक

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर