ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

बाभूळगाव तालुक्यात मेडिकल बंदला प्रतिसाद:केमिस्ट संघटनेचा‎ तहसीलवर मूक मोर्चा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“केंद्र सरकारकडे वारंवार चर्चा करून सुदधा सरकार कडून ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याबाबत,कॉपरेट द्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करण्याबाबत, बनावट औषधीपासून देश वाचवण्यासाठी कोवीड जीएस आर २२० मागे घ्यावा यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊले उचलली नाही. म्हणून ऑल इंडीया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने बुधवारी २० मे रोजी भारतभर केमिस्ट दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशियनने पठिबा दिला. या बंद मध्ये बाभुळगाव तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटने तर्फे तालुक्यातील बाभूळगाव, सावर, आसेगाव देवी, दिखी २, राणिअमरावती, पहूर, दाभा, दिघी १, घारफळ, कोल्ही, कोपरा जानकर, गणोरी, नायगाव, मदनी, वेणी, वाटखेड इत्यादि गावामधील ३२ मेडीकल दुकाने कडकडीत बंद ठेवली. बंद दरम्यान बाभुळगाव शहरामधून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांना दिले.मागण्यांचे निवेदन देते वेळी बाभुळगाव तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष अनिल खोडे सचिव संतोष वर्मा, कोषाध्यक्ष मयूर पिसे, प्रसिद्धी प्रमुख रोहनीश फसाटे, सदस्य संतोष गुप्ता, अक्षय मंहिंदे पंकज महिंदे, शोएब शेख, अबरार शेख, नजरु काझी, सुरज बोंबले, सुनिल खोडे, मयुर डफले, योगेश्वर पिसे, सागर चिजकार, श्रीकांत डफळे, अभिनव धवस, सोएल शेख, काझी नजरुदीन, निखील उमरतकर, शेहजाद खान, सुमित डंभारे, शेख युसुफ, अमोल राऊत, समिर पुनेवार मेडीकल व्यवसाईक यांनी बुधवारी २० मे रोजी मागण्याचे निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांना दिले.या वेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर