ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

हिंगोलीत विवाहितेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ काढला:ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचार, दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यातील एका विवाहित महिलेला धमकी देऊन अत्याचार केला अन अश्लील व्हिडिओ काढून बदनामीची धमकी देणाऱ्या एका तरुणासह दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास कामाला गती दिली असून दोन्ही आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बावनखोली भागातील अमनखान या तरुणाने जिल्हयातील एका महिलेस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्या इच्छे विरुध्द अत्याचार केला यावेळी तिला धमकीही दिली. मात्र भिती पोटी तिनेने सदर प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर अमनखान याने वेळेवेळी तिला धमकी देऊन शारिरीक संबंध ठेवले. दरम्यान, सदर महिला तिच्या लहान बहिणीच्या लग्नासाठी हिंगोली शहरात आली असतांना अमनखान याने बळजबरीने तिच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या त्याचा मित्र सलमानखान याने महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून बदनामी करण्याची धमकी दिली. मागील तीन वर्षापासून त्यांचा अत्याचार सहन करणाऱ्या महिलेने अखेर त्यांच्या धमक्यांना भिक न घालता सोमवारी ता. 15 रात्री थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून हिंगोली शहर पोलिसांनी अमनखान व सलमान खान यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, उपनिरीक्षक युवराज वाघमारे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. प्रकरणात वरिष्ठ पोलिसांनी लक्ष घालून तपासाची माहिती घेतली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर