ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नियमित योगामुळे निरोगी, आनंदी जीवन जगता येते:डॉ. अशोक उनके यांचे योग कार्यक्रमात प्रतिपादन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नियमित योग करा आनंदी व निरोगी जीवन जगा, असा संदेश ना. डॉ. अशोक उनके यांनी दिला. येथील पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या योग दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पोलिस प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिविंग,जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व भाजपा यवतमाळ, मदन येरावार मित्रपरिवार आयोजित योग दिवस कार्यक्रम पोलिस कवायत मैदान येथे पार पडला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, भाजपचे महामंत्री आणि योग आयोजन समितीचे समन्वयक राजु पडगीलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. योग आयोजन समितीचे समन्वयक राजू पडगिलवार यांनी सर्वांना संकल्पची शपथ दिली. यावेळी योगशिक्षक म्हणून जनार्दन स्वामींचे महेश जोशी, पतंजलीचे संदीप खांदवे, शरद टेम्भेकर, माया चव्हाण, प्रतिभा खसाळे, आर्ट ऑफ लिविंग कडून पूजा शेटे, प्रदीप उमरे, नीरज जयस्वाल, गजानन बिल्लावर यांनी योग प्रशिक्षण दिले. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख ज्ञानोबा देवकते, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सतीश चवरे, अवधूतवाडीचे ठाणेदार अजित कदम, लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रोहित चौधरी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. राजीव मुंदाणे, डॉ. समीर बेलूरकर, डॉ. मनोज येरावार, पतंजली योग समितीचे संजय चाफले, पंडित वारंगे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे मनीष गुबे, कीर्ती राऊत, पूजा घोडे, योग नृत्य परिवाराचे संतोष वर्मा, माणिक मेहरे, सतीश बनगीनवार, क्रीडा भारती, आरोग्य भारती, तनिष्क महिला व्यासपीठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निमा संघटना, नंदानु योग केंद्र, शक्ती फाउंडेशन, भाजपा उडान महिला मंच, जिजाऊ फौंडेशन, शारीरिक शिक्षक संघटना आदी सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर