ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘माधुरी’ हत्तीण कोल्हापुरात परतणार:पुनर्वसनासाठी ‘वनतारा’च्या टीमकडून नांदणीत पाहणी, वर्षभराचा संघर्ष संपणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन संस्थान मठाचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात माधुरीचे नांदणी मठात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘वनतारा’ आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या निवासासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असून, यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी ‘वनतारा’ची एक उच्चस्तरीय तज्ज्ञ टीम नांदणीत दाखल झाली होती. या टीमने दिवसभर मठाच्या परिसरात तळ ठोकून माधुरीच्या भविष्यातील वास्तव्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा, तिची सुरक्षा आणि दैनंदिन देखभालीच्या जागेची बारकाईने पाहणी केली. माधुरी हत्तीण पूर्वी ज्या ठिकाणी राहत होती, त्याच परिसरात तिच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन नवीन पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. ही संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर, या संदर्भातील अहवाल उच्चाधिकार समितीकडे पाठवून तिच्या परतीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. जिनसेन संस्थान मठ, नांदणी यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या सुखद बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. मठाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “नांदणी मठासाठी अत्यंत आनंदाची बातमी! आपली लाडकी माधुरी (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्यातील सकारात्मक घडामोडींमुळे पुढील एका महिन्यात माधुरी आपल्या लाडक्या नांदणी भूमीत परतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिच्यावर लाखो भाविकांचे प्रेम आहे, ती पुन्हा मठाच्या परिसरात दिसावी हीच सर्वांची प्रार्थना होती. हा भाविकांच्या श्रद्धेचा विजय आहे.” २८ जुलै २०२५ चा ‘तो’ भावनिक निरोप अन् वर्षभराचा संघर्ष माधुरी हत्तीणीला विशेष आरोग्य सुविधा आणि देखभालीसाठी २८ जुलै २०२५ रोजी गुजरात येथील ‘वनतारा’ प्रकल्पात नेण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मठाचे वैभव गेल्याची भावना व्यक्त करत लाखो नागरिकांनी हळहळ व्यक्त केली होती. माधुरी हत्तीणला परत आणण्यासाठी त्यावेळी कोल्हापुरात लोकांकडून आंदोलन देखील करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून तिला पुन्हा आणण्यासाठी मठाकडून आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता या प्रयत्नांना यश येताना दिसत असून, लवकरच नांदणीची भूमी आपल्या लाडक्या ‘माधुरी’च्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर