ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ:परभणी येथील सासरच्या 9 जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच माहेरावरून 5 लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या नऊ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 14 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालु्क्यातील कारवाडी येथील नंदा यांचा विवाह परभणी येथील महेंद्र कांबळे याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. मात्र त्यांनी सासरचा छळ सहन केला. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र तुला मुलगा होत नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी सतत टोमणे मारण्यास सुरवात केली. तसेच माहेरावरून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या पैसे आणू शकत नव्हता. त्यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सासरचा छळ असह्य झाल्याने त्या माहेरी आल्या. त्यानंतर त्यांनी पोलिस दलाच्या महिला दक्षता समितीमध्ये अर्ज दाखल केला. दक्षता समितीने दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यात तडजोड होऊ शकली नाही. या प्रकरणात नंदाबाई यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी महेंद्र कांबळे, संतोष कांबळे, दीपक कांबळे , वामन धुमाळ (रा. परभणी), विनोद रत्नापरखे (रा. वाशीम) यांच्यासह अन्य चौघांवरर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार बाळासाहेब खोडवे, के. एस. चिलगर पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर