ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू असलेले कालव्याद्वारे सिंचनाचे आवर्तन तत्काळ थांबवण्यात आले. आता धरणावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा सोमवारपासून (१५ जून) खंडित करण्यात येणार आहे. धरणावर सुमारे १ हजार शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजना असल्याची माहिती प्रशासनाकडून समजली. त्याचा फटका १,१५० हेक्टरहून अधिक शेती क्षेत्राला बसणार आहे. धरणात सद्यस्थितीत ६ हजार ७६६ दशलक्ष घनफूट एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. हे प्रमाण मागील वर्षीच्या (२०२५) तुलनेत २ हजार ४०० दशलक्ष घनफूटाने कमी आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ‘एलनिनो’च्या संकटामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने धरणे आणि जलाशयातून सुरू असलेली सिंचनासाठीची आवर्तने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नदी व कालव्यातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मुळा धरणाच्या बॅक वॉटर भागात शटडाउन घेतले जाणार आहे. सोमवारपासून (१५ जून) बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी म्हैसगाव, आग्रेवाडी, वरवंडी, बाभूळगाव, खडांबे, धामोरी परिसरात दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. २ हजार २६६ दलघफू पिण्यासाठी राखीव मुळा धरणाची क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. यंदा दोन रब्बीसह उन्हाळी आवर्तनानंतर सद्यस्थितीत ६ हजार ७६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यातून मृत जलसाठा सुमारे ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट वगळता, प्रत्यक्षात सुमारे २ हजार २६६ दलघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. बेकायदेशीर पाणी उपसा थांबवावाच लागेल पिण्यासाठी तसेच औद्योगिकसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी राखीव केले आहे. एलनिनोमुळे पाऊसच येणार नाही, असे नाही. पाऊस पडेल पण कमी पडेल. पिण्यासाठी पाणी राखीव केल्याने प्रशासनाला सतर्क व्हावे लागेल. विद्युत मोटरीद्वारे बेकायदेशीर पाणी उपसा थांबवावा लागेल. – उत्तमराव निर्मळ , निवृत्त कार्यकारी अभियंता. वीज तोडण्याबाबत महावितरणला दिले होते पत्र मुळा जलाशयातील उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला पत्र दिले होते. त्यावेळी पिण्यापुरते चार तास वगळण्यात आले होते. परंतू, आता ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णवेळ या योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणच्या समन्वयाने सोमवारपासून हा पुरवठा खंडित केला जाईल. – सायली पाटील, कार्यकारी अभियंता. सिंचनासाठी वापरले ८१८१ दलघफू पाणी मुळा धरणातून सोडलेल्या आवर्तनातून सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. यंदा ओव्हरफ्लोतून पहिले आवर्तन सोडले होते. त्यानंतर रब्बी हंगामात दोन आवर्तनासाठी उजव्या कालव्याद्वारे ८ हजार १८१ दशलक्ष घनफूट पाणी सोडले. तर डाव्या कालव्यातून दोन आवर्तनातून १०८७ दशलक्ष घनफूट पाणी सोडले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर