ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

श्रमदानातून 500 वर्षांच्या बारवचे जतन अन् संवर्धन:इतिहासाच्या पाऊलखुणांना विद्यार्थ्यांनी केले पुनर्जिवित, श्रमदानातून जपली ऐतिहासिक वास्तू‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोबाइल आणि सोशल मीडियाच्या युगात आजची तरुण पिढी इतिहास व संस्कृतीपासून दूर जात असल्याची चर्चा होत आहे. मात्र असे असताना वणीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून वेगळा आदर्श घालून दिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून शहरातील शतकांपूर्वीच्या ऐतिहासिक बारवेची स्वच्छता करून तिचे जतन करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. वणी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रामागे आणि नगाजी महाराज मंदिराजवळ असलेली ही प्राचीन बारव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होती. झाडा-झुडपे, गवत आणि कचऱ्यामुळे तिचे मूळ स्वरूपच हरपून गेले होते. इतिहासाचा हा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना अभाविपच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत बारव परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बारवेतील व परिसरातील कचरा हटवला, झाडाझुडपे तोडून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पुन्हा खुलवले. अनेक तासांच्या मेहनतीनंतर बारव पुन्हा एकदा नागरिकांच्या नजरेस पडू लागली आहे. स्थानिक इतिहास अभ्यासकांच्या मते, गोंड राजवटीच्या काळात सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी या बारवेची निर्मिती झाली. श्री गणेशासह विविध देवतांची शिल्पे, कलाकुसर आजही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. इतिहासप्रेमींच्या मते, या बारवेतून चंद्रपूरसह इतर भागांना जोडणारे भुयारी मार्ग असल्याच्या आख्यायिकाही प्रचलित आहेत. या उपक्रमात अमित उपाध्ये, वैभव वाघमारे, अनिकेत बदखल, संदीप गोहोकार, सागर जाधव, अक्षय कवरसे, कपिल राऊत, वैभव मेहता आणि नीरज चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला. अभाविपच्या नगरमंत्री आयुषी पुलेवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी श्रमदान करून उपक्रम यशस्वी केला. श्रमदानातून वारसा, संर्वधनाचा दिला संदेश अभाविपच्या विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहीम नसून सांस्कृतिक वारसा जतन करण्याची चळवळ ठरली आहे. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. समाजातील प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देण्याची गरज असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. वणीतील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर