ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अवैध उपशानंतर खनिकर्म विभागाचे पथक पाहणीसाठी पोहोचले घाटावर:मुदत संपल्यावर पथक बोरी-चातारी घाटावर दाखल‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पैनगंगा नदी पात्रातील हर्रासी न झालेल्या बोरी-चातारी रेतीघाटावर रेती हंगाम २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या विद्रुप झालेल्या नदीपात्राची पाहणी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी लावून धरली होती. अखेर, वाळूघाटांची अधिकृत मुदत संपल्यानंतर जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक धनाजी जाधव हे पथकासह दि. १२ जून रोजी पहाटे संबंधित तक्रारकर्ते व तलाठ्याला सोबत घाटावर दाखल झाले. मात्र, संपूर्ण हंगामभर अवैध वाळू उपसा झाल्यानंतर आता झालेल्या पाहणीमुळे खनिकर्म विभागाचे हे पाऊल म्हणजे “वरातीमागून घोडे’ नाचवण्याचाच प्रकार असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विदर्भ – मराठवाड्याच्या सिमावर्ती भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात बोरी चातारी हद्दीत स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहमतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून लाखो रुपयांची वाळू तस्करी होत असल्याच्या पर्यावरण प्रेमी नागरीकांच्या तक्रारी मागील ३ ते ४ महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडे सुरुच आहेत. परंतू स्थानिक महसूल प्रशासनाने तक्रारींना जुमानले नाही. दि. ३० मार्च रोजी एलसीबीकडून चातारी वाळूघाटात उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्याचा प्रयत्न झाला, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे हा वाळूघाट चांगलाच गाजला होता. तेव्हापासून महसूल प्रशासनाच्या अखत्यारित पोलिसांचा हस्तक्षेप झाला नाही. त्यानंतर स्थानिक महसूल अधिकारी व वाळूमाफिया यांची जमल्याने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू झाली.वाळू उत्खननाच्या तक्रारी वाढत असल्यातरी या वाळू घाटावर रेती तस्करांचा मुक्त संचार होता. कार्यवाही करण्यास कोणताही अधिकारी धजावत नव्हता. अशा तऱ्हेने दि. १० जून रोजी वाळू घाटांची मुदत संपली आता नदीपात्रात पाणी यावे, त्याबरोबर खड्डे झाकून जावे, अशी मागणी स्थानिकांची होती. दरम्यान ११ जून रोजी कॅनलचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले, परंतु बचाव झाला नाही, बोरी वाळूघाट भागात पाणी मात्र पोहचलेच नाही, त्यामुळे वाळू चोरीला गेल्याचे खनिकर्म पथकाच्या लक्षात आले. जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय पथकामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक धनाजी जाधव, महसूल सहाय्यक सुरेश ठोंबरे, वाहन चालक निलेश भाटबडवे यांच्यासह स्थानिक तलाठी राहुल चव्हाण, बोरीचे पोलिस पाटील प्रदीप माने यांचा समावेश होता. आपल्याकडे भरमसाठ पुरावे जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे पथक पहाटे बोरी चातारी वाळूघाटात दाखल झाले. नदीपात्रात तीन किलोमीटर पाहणी केली, परंतू त्यांनी विदर्भ हद्दीतील पाणी व खडक असलेल्या जागेवर उभे राहुन फोटो काढले, जास्त प्रमाणात उत्खनन झालेल्या ठिकाणचे गुगल टॅग फोटो काढण्यास नकार दिला शेवटी त्यांच्या एकंदरीत देहबोलीतून गोंधळ उडाल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे अहवाल सकारात्मक राहण्यासाठी शंकेची पाल चुकचुकली आहे. आपल्याकडे भरमसाठ पुरावे असून याबाबत शर्थीने पाठपुरावा करणार आहे. – विद्यानंद देवसरकर , सामाजिक कार्यकर्ता, दिघी ता. हिमायतनगर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर