ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नांदगाव पेठ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले:आरक्षण सोडत जाहीर, साेडतीने समीकरणात बदल; गावांत इच्छुकांच्या हालचालींना वेग‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तसेच २०१५ आणि २०२०-२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील आरक्षणाचा विचार करून विविध प्रभागांतील सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण ६ प्रभागांमधील १७ सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), सर्वसाधारण तसेच महिला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महिला आरक्षणालाही यावेळी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून विविध राजकीय गट, पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षण सोडत प्रसंगी अध्यासी अधिकारी विजय वाघमारे, तलाठी आदेश गजभिये, धीरज बोबडे, राजेश दंदे, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोन्डे यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकलीच्या हाताने आरक्षणाची सोडत काढण्यात आली

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर