ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बंद हायमास्ट लाईटमुळे अपघातात वाढ

372 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कडेला असलेल्या दुभाजकाला धडकतात वाहने

संबंधीत विभागाचे दुर्लक्ष

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी जवळ असलेले हायमास्ट लाईट मागील 3 महिन्यापासून बंद आहे.रात्रीच्यावेळी नवीन या परिसरात नव्याने येणारे वाहनधारक यांना रस्त्याचा अंदाज नसल्याने अनेकवेळा वाहने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या दुभाजकावर धडकत असल्याचे चित्र असून संबंधीत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसत आहे.

मारेगाव ते यवतमाळ दरम्यान राज्य महामार्गावरील मारेगाव जवळील करणवाडी फाट्याला लागून मोठे हायमास्ट लाईट लावण्यात आलेले आहे. येथे वाहनधारकांसाठी वाहनतळ असून येथे वाहनधारक विश्रांतीसाठी थांबत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठया हायमास्ट लाईटची व्यवस्था करण्यात आली. परंतु मागील 3 महिन्यापासून हे हायमास्ट लाईट बंद अवस्थेत आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याला लागून असलेल्या दुभाजकावर जाऊन वाहने आदळतात आणि अपघात घडतात. या ठिकाणी प्रत्येक आठवड्यामध्ये दोन ते तीन किरकोळ स्वरूपाचे अपघात घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याकडे संबंधीत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन पाहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे.

संबंधीत विभागाला होत असलेल्या अपघाताच्या घटना ह्या बहुतेक कमी वाटत असल्यानेच याकडे डोळेझाक करते की काय अशी शंकाही व्यक्त केल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर