ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

आता पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू!:उद्धव ठाकरे मेहनत घेतात आणि तुम्ही खासदार फोडतात, ही कसली लोकशाही?- संजय राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून घेणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही यंत्रणेची धमकी कोणाला देत आहात? आम्ही कारागृहात जाऊन आलो आहोत, पु्न्हा जाण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला धडा शिकवून जेलमध्ये जाईल. आमचाच पक्ष मुळ शिवसेना आहे, शिंदेंचा गट आहे. जे दावा करतात आमचे खासदार फुटले त्यांनी ते सिद्ध केले पाहिजे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मेहनत घेतात उमेदवार निवडून आणतात आणि तुम्ही त्यांना फोडतात ही कसली लोकशाही आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशात जाऊन भाषणं करतात, त्यांनी देशात काय सुरू आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बैठकीला आम्ही खासदारांची वाट बघू नाहीतर कारवाईला सुरूवात करणार. जे खासदार फुटतील त्यांनी सुटी देणार नाही. बेईमानी करणाऱ्या लोकांना आता सोडणार नाही, त्यांच्या मतदारसंघात आम्ही सभा घेणार आहोत यासाठी आमच्यासोबत शरद पवार आणि काँग्रेससुद्धा असणार आहेत. कोणी खासदार फुटला तर त्यांना आम्ही धडा शिकवू.
सर्वांना व्हीप पोहोचला संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते अरविंद सावंत यांनी आज खासदारांची व्हीप काढत बैठक बोलावली आहे. जेव्हा व्हीप काढला जातो त्यावेळी बैठकीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, तो एकप्रकारे पक्षाचा आदेशच असतो, तो पाळावाच लागतो. हा व्हीप सर्व खासदारांपर्यंत पोहोचला आहे. व्हीप त्यांना व्हॉटॲप, फोन, इमेल आणि त्यांच्या घरी सुद्धा पाठवण्यात आला आहे. परिस्थिती पाहत 15 खासदार येतील असे वाटते संजय राऊत म्हणाले की, कालपासून बातम्यामध्ये जे वातावरण दिसून येते त्यामुळे मला असे वाटते 9 खासदार असलेल्या आमच्या पक्षाच्या बैठकीला आज 15 खासदार उपस्थित राहतील. आम्ही आताच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही खासदारांना पाठवलेला व्हीप 3 लाईनचा आहे.

..तर कायदेशीर कारवाई करणार अरविंद सावंत म्हणाले की, व्हीप बजावत बैठकीला बोलवल्यानंतर जे खासदार गैरहजर राहिले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते. मी काही शिवसेना पक्ष प्रमुख नाही मी केवळ कार्यकर्ता आहे, मी व्हीप बजावला कारवाई संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यसभेत शरद यादव सदस्य होते त्यांनी विरोधी पक्षाच्या स्टेजवर जात भाषण दिले त्यावेळी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की आमदार-खासदार फुटला तर त्याला रस्त्यावर तुडवा कारवाईची चिंता करू नका असा आदेश होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर