ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वक्फ बोर्डाच्या वादातून चौघांनी मशिदीच्या व्यवस्थापकावर झाडल्या गोळ्या‎:नांदेड शहरात रविवारी पहाटे अडीच वाजता थरार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील बरकतपुरा, वाघी रोडवरील‎‎ अबरार फंक्शन‎‎ हॉलसमोर पहाटे अडीच‎‎ वाजता मित्र शिवशंकर‎‎ अंबादास पवार यांच्यासोबत बोलत ‎‎असताना मशिदीचे‎‎ नायब मुतवल्ली‎‎(उपव्यवस्थापक)‎शेख शमीम शेख इसाक यांना‎ दुचाकीवरून आलेल्या चौघांनी आधी‎ दर्ग्याचा पत्ता विचारला. त्यानंतर पत्ता‎ सांगण्यापूर्वीच शेख शमीम यांच्यावर‎ गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर‎ आरोपींनी शेख शमीम शेख इसाक ‎यांच्यावर तलवार आणि खंजरने हल्ला‎ चढवला. गंभीर जखमी शेख शमीम‎यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू‎ झाला. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ‎ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा‎ दाखल असून चौघांना अटक झाली.‎ पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‎वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील‎जुनी पाण्याची टाकी, खडकपुरा येथील‎रहिवासी शेख शमीम शेख इसाक (४१)‎हे दर्गा हजरत शहा रहमान आणि दुलेशा‎रहमाननगर मशिदीचे नायब मुतवल्ली ‎म्हणून १४ वर्षांपासून कामकाज पाहत‎होते. सन २०१५ मध्ये मिर्झा बेग आणि‎शेख हाफिज यांनी बोगस कागदपत्रे‎तयार केल्याचा आरोप होता.‎त्याविरोधात शेख शमीम यांनी दिलेल्या ‎तक्रारीवरून वक्फ बोर्डाकडे गुन्हा‎दाखल करण्यात आला होता.‎ तलवार, खंजीरनेही वार; दुचाकीवर आले होते मारेकरी, वजिराबाद ठाण्यात ७ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, तर चौघांना अटक‎ मिर्झा बेगविरोधात गुन्हा‎दाखल; वाद कोर्टात‎
वक्फ बोर्डाकडे गुन्हा केल्याचा राग‎मनात धरून मिर्झा बेग यांनी शेख‎शमीम शेख इसाक यांच्याशी वाद‎घालून भांडणे केली होती. याच‎प्रकरणी २०२३ मध्ये मिर्झा बेग यांनी‎शमीम यांना दर्गा हजरत शहा‎रहमान व मशीद दुलेशा रहमान,‎खडकपुरा येथील कामकाज‎सोडून देण्याबाबत धमकावले होते.‎याप्रकणी वजीराबाद ठाण्यात‎आरोपीविरोधात गुन्हे दाखल‎ करण्यात आले होते. हे प्रकरण नांदेड कोर्टात सुनावणीसाठी आहे. ‎ दर्ग्याचा पत्ता विचारला,‎मग गोळ्या झाडल्या‎
शेख शमीम हे मित्र शिवशंकर‎अंबादास पवार (रा. पिंपळगाव‎पोरगा) यांच्यासोबत बरकतपुरा,‎वाघी रोडवरील अबरार फंक्शन‎हॉलसमोर बोलत बसले होते.‎दुचाकीवरून आलेल्या चार‎जणांनी आधी दर्ग्याचा पत्ता‎विचारला. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर‎असल्याचे लक्षात येताच पवार‎काही सांगण्यापूर्वीच आरोपींनी‎शेख शमीम यांच्यावर गोळ्या‎झाडल्या. त्यानंतर तलवार आणि‎खंजरने सपासप वार केले.‎ खासगी रुग्णालयात‎ उपचारादरम्यान मृत्यू‎
रविवारी पहाटे अडीच वाजता‎झालेल्या गोळीबारानंतर रक्ताच्या‎थारोळ्यात पडलेल्या शमीम यांना‎मशीन खान, सय्यद मतीन, इरफान‎खान, सय्यद इराक यांनी खासगी‎रुग्णालयात भरती केले होते. मात्र‎उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎याप्रकरणी मिर्झा शब्बीर बेग, मिर्झा‎कलंदर बेग यांच्यासह सात‎जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल‎करण्यात आला आहे. भल्या पहाटे‎ झालेल्या गोळीबाराच्या थराराने पुन्हा‎एकदा हादरले आहे.‎ ‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर