ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

भरतीचा खेळखंडोबा:वसंतराव नाईक कॉलेजच्या प्राचार्यांची नियुक्ती वादात; ‘बामुक्टो’ संघटनेकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील प्रसिद्ध वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची नियुक्ती आता एका मोठ्या वादात सापडली आहे. महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. संजीव एम. रेड्डी यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने झाली असल्याचा गंभीर आरोप ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना) या संघटनेने केला आहे. या संदर्भातील एक सविस्तर तक्रार पत्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के आणि सचिव डॉ. मारोती तेगमपुरे यांनी उच्च शिक्षण विभागाच्या सह-संचालकांना दिले आहे. या नियुक्तीची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून प्राचार्यांच्या वेतन निश्चितीला स्थगिती देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संघटनेने केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राचार्य पदासाठी २७ एप्रिल २०२४ रोजी पहिली जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या नियमांनुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० दिवसांची म्हणजेच २६ मे २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे वेळेत मुलाखती होऊ शकल्या नाहीत, ज्यामुळे संस्थेने ८ जानेवारी २०२६ रोजी या प्रक्रियेला मुदतवाढ दिली. ‘बामुक्टो’ संघटनेचे मुख्य ३ कायदेशीर आक्षेप संघटनेच्या प्रमुख मागण्या १. या संपूर्ण संशयास्पद भरती प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय कायदेशीर चौकशी लावण्यात यावी. २. चौकशीचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत डॉ. संजीव एम. रेड्डी यांच्या प्राचार्य पदाच्या वेतन निश्चितीला (Pay Fixation) तात्काळ स्थगिती द्यावी. ३. कायदेशीर पडताळणी प्रलंबित असताना त्यांना शासकीय निधीतून कोणताही आर्थिक लाभ दिला जाऊ नये. प्रशासनाला इशारा जर कायदेबाह्य पद्धतीने प्राचार्यांना आर्थिक लाभ किंवा वेतन मंजूर केले गेले, तर याची संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी उच्च शिक्षण सह-संचालक कार्यालयाची राहील, असा थेट इशारा संघटनेने पत्रात दिला आहे. तक्रारीच्या प्रती कोणाकोणाला पाठवल्या? या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी ‘बामुक्टो’ संघटनेने या पत्राच्या प्रती (Carbon Copies) महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव (मंत्रालय), उच्च शिक्षण संचालनालय (पुणे चे संचालक) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवल्या आहेत. या पत्रामुळे आता शहरातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवेदनावर डॉ. बप्पासाहेब मस्के, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. शफी शेख, डॉ. संजय कांबळे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. रामहरी मायकर, डॉ. रामहरी काकडे, डॉ. उषा माने यांच्या सह्या आहेत. दरम्यान, वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाच्या भरतीबाबत दिव्य मराठी डिजिटलने संस्थेचे संस्थाचालक आणि सध्याचे प्राचार्य डॉ. संजीव रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर