ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

पडेगावातील निष्काळजी खोदकामाविरोधात गुन्हा दाखल करावा:मनपा गटनेते गणेश लोखंडे यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले; मात्र खोदकामानंतर रस्ता पूर्ववत करण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले असून विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे असल्याचे लोखंडे यांनी आपल्या पत्रात कळविले आहे. विविध वृत्तपत्रांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित कंत्राटदार तसेच कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्या समन्वयाअभावी काम रखडले असून यामुळे आगामी पावसाळ्यात नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती या पत्रात गणेश लोखंडे यांनी दिली. संबंधित कंत्राटदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी आणि खोदकामास परवानगी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी गटनेते गणेश लोखंडे यांनी केली आहे. तसेच या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लोखंडे यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर