ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कोपरगावात मोफत आरोग्य शिबिरात 256 रुग्णांची तपासणी:आईच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगपती कैलास ठोळे यांचा उपक्रम‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु, पहिली वैद्य आणि पहिली देवता असते. तिच्या मायेचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिच्या स्मृतींना समाजसेवेची जोड दिली, तर त्या स्मृती खऱ्या अर्थाने अमर होतात. अशीच मातृभक्ती, समाजसेवेची जाणीव आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम एस. जे. एस. हॉस्पिटल’ येथे अनुभवायला मिळाला. उद्योगपती कैलास ठोळे यांनी मातोश्रींच्या स्मृतींना अभिवादन करत, एस. जे. एस. हॉस्पिटलच्या सहकार्याने महिला, गरजू नागरिक आणि ज्येष्ठांसाठी मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे यांच्या हस्ते या शिबिराचा समारोप झाला. यावेळी हॉस्पिटलचे चेअरमन चांगदेव कातकडे, विजय कडू, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष विजय बंब, हिरालाल महानुभाव, उत्तमभाई शहा, गुजराथी ताई, सुनील बोरा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात २५६ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आईच्या स्मृतींना सर्वात मोठी श्रद्धांजली म्हणजे समाजाच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणे, हा संदेश ठोळे परिवाराने आपल्या कृतीतून दिला आहे. सेवा आणि समर्पणाच्या या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा उपक्रम समाजासाठी मोठी प्रेरणा ठरला असून, या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर