ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

नांदेडमध्ये निकालानंतर संजय राऊत यांची मोठी घोषणा:कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेसेनेतून हकालपट्टी; केवळ 84 मते मिळाली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांच्या दारुण पराभवानंतर काही मिनिटांतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला. ही कारवाई फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलावर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. केवळ ८४ मते; भाजपचे अमरनाथ राजुरकर विजयी नांदेड विधान परिषद निवडणुकीत एकूण ४५२ पैकी ४५१ मतदान झाले. यापैकी २३ मते बाद ठरली. अंतिम निकालात भाजप महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांनी ३३९ मते मिळवत विजय मिळवला. तर महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोले यांना ५ मते मिळाली. राऊतांचा थेट निर्णय – पक्षातून हकालपट्टी निकालानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी जाहीर केले की, “कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उबाठा) पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.” या निर्णयामुळे ठाकरे गटाने पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणि आधीच वाढलेला संभ्रम निवडणुकीच्या आधीच ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीतील नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाच्या उमेदवारीकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. या निवडणुकीपूर्वी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांच्यावर टीका करत ते “धूर्त आणि चतुर” असल्याचा आरोप केला होता. निकालानंतर त्यांचा पराभव आणि त्यानंतरची हकालपट्टी यामुळे त्यांच्या वक्तव्याचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत मोठी मतफूट; काँग्रेसला धक्का या निवडणुकीत काँग्रेसकडे ९२ मते असताना कृष्णा आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील किमान ८ ते २७ मतांची फुटफूट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर काही मते थेट भाजपच्या पारड्यात गेल्याचा आरोपही होत आहे. २३ मते बाद; नांदेडमध्ये ऐतिहासिक अपवाद या निवडणुकीत २३ मते बाद ठरल्याने नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात हा मोठा अपवाद ठरला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मते बाद होणे ही देखील चर्चेचा विषय बनली आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व, समन्वय आणि मतदान व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोपही होत आहे. राजकीय तापमान वाढले नांदेडचा हा निकाल आणि त्यानंतरची तात्काळ हकालपट्टी यामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरे गटात अंतर्गत तणाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणावर आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल 1) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप 2) धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप 3) नांदेड- अमर राजूरकर, भाजप 4) सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप 5) नागपूर- राजीव पोतदार, भाजप 6) भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप 7) अमरावती- प्रवीण पोटे, भाजप 8) जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप 9) सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप 10) परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना 11) नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार सहा उमेदवार बिनविरोध 12) ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध) 13) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध) 14) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) 15) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) 16) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध) 17) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध) संबंधित बातमी वाचा… विधान परिषद निवडणूक निकाल:महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. वाचा संपूर्ण बातमी नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर