ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

डंपरच्या चाकाखाली चिरडून कोल्हापूरचे दांपत्य जागीच ठार:अपघातानंतर पळणारा वसमतचा चालक पोलिसांच्या ताब्यात‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भरधाव वेगातील रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून पती-पत्नी जागीच ठार झाले. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२३ जून) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास पारनेर शिवारातील कन्हेर ओहोळ परिसरात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. भीमराव बंडू कांबळे (वय ३६) व गौरी भीमराव कांबळे (वय ३०, मूळ रा. उमगाव, चंदगड, जि. कोल्हापूर) अशी मृत दांपत्याची नावे आहेत. भीमराव हे सुपे एमआयडीसीतील अंबर कंपनीत नोकरीला होते. त्यांनी घर बांधण्यासाठी पळवे येथे प्लॉट घेतला होता. त्याच्या खरेदीखताच्या नोंदणीसाठी ते पारनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जात होते. मात्र, कार्यालयाच्या अवघ्या दोन किमी आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. अपघातानंतर डंपर चालकाने (एमएच १६ सीडी ९१५०) वाहनासह पारनेरच्या दिशेने पळ काढला. मात्र, शहरात आज खासदार नीलेश लंके यांच्या जनआक्रोश मोर्चामुळे मोठी गर्दी होती. पुढे जाणे अशक्य असल्याचे लक्षात येताच चालकाने घटनास्थळापासून ३०० मीटरवर डंपर सोडून पळ काढला. पोलिसांनी तत्परता दाखवत चालक गजानन हंबरडे (रा. वसमत) याला ताब्यात घेतले आहे. गौरी कांबळे चालकाचा निष्काळजीपणा कांबळे दांपत्य प्लेझर दुचाकीवरून (एमएच ०९ जीएन ५३०३) सुप्याकडून पारनेरकडे जात होते. कन्हेर ओहोळजवळ पाठीमागून येणारे डंपरचे धूड पाहून गौरी कांबळे यांनी चालकाला थांबण्यासाठी हातवारे व आरडाओरडा केला होता. मात्र, चालकाने वेग कमी केला नाही. अपघातस्थळापासून ५० मीटरवर पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर वेग कमी करणे अपेक्षित होते. चालकाच्या निष्काळजीपणामुळे डंपरची चाके दांपत्याच्या अंगावरून गेली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर