ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा:आदिवासी छात्र, एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आ. मांगुळकर यांची भेट‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन गंडाळे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे दिग्रस तालुका अध्यक्ष रामेश्वर पेंदोर यांनी विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, मूलभूत समस्यांवर अत्यंत सखोल, सकारात्मक चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, उच्च शिक्षणातील अडचणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची आवश्यकता, युवकांसाठी रोजगार निर्मिती, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य आदी विषय मांडण्यात आले. तसेच वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित दाव्यांचा निपटारा, वनउत्पादनांना योग्य बाजारभाव, आदिवासींच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण यावरही चर्चा झाली. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांना प्रोत्साहन, आरोग्य सुविधा, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना, ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी करण्यात आली. अनेक पात्र लाभार्थी आजही योजनांपासून वंचित असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी समाजाच्या प्रश्नांचे गांभीर्याने ऐकून घेत शासन स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही भेट आदिवासी समाजाच्या विकासासाठी, हक्कांसाठी, भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास गजानन गंडाळे व रामेश्वर पेंदोर यांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर