ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी:गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्तांचा सत्कार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जय मल्हार बहुउद्देशीय संस्था, दारव्हा यांच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, प्रेरणादायी उपक्रमांनी सजलेला हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप पुनसे महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून दारव्हा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील चिरडे, अनंतरावजी कोरडे, वैशाली मासाळ, प्रमोद मेटांगे, प्रशांत मासाळ, सुखदेवराव नवरंगे, निकेश उघडे, काजळे साहेब, मनोहरराव थोटे, मुकेश महाराज चुडे, बाबारावज महानर, गंधे, कचरे उपस्थित होते.अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान करण्यात आला.याशिवाय दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्याचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्रावण दाढे, सचिव सुधाकर काळे, उपाध्यक्ष विलासराव कापडे, सहसचिव वंदेवराव कापडे, कोषाध्यक्ष संतोष शेंडगे, सुनील फुसांडे, ओंकार गोरडे, विनोद गंधे, डाखोरे, प्रल्हादराव कचरे, प्रकाशराव उघडे, विठ्ठलराव करडे यांनी परिश्रम घेतले. संचालन सुधाकर काळे, ऋषिकेश कचरे यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर