ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

क्रूरतेचा कळस!:दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, मारहाण करणारा अतुल सावेंचा ‘खास’; अंबादास दानवेंचा दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच यातील एक व्यक्ती तर थेट दगडाने मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मारहाण करणारी व्यक्ती ही भाजप नेते व मंत्री अतुल सावे यांच्या जवळची असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रिपद गमावले तर कोणी तुरुंगात तुरुंगात सडत आहे. पण मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकूटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही, असे दानवे म्हणाले. पुढे अंबादास दानवे म्हणाले, ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? ​दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. ​सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ? असा सवाल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील असून काही महीने आधीचा आहे. हा जुना व्हिडिओ दानवे यांनी बाहेर काढला आहे. तसेच ज्या व्यक्तीला मारहाण केली गेली, ती व्यक्ती जीवंत आहे की मेली, हेही आपल्याला माहित नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. मारहाण करणारा दामू अण्णा शिंदे- अंबादास दानवे एका वृत्तवाहिनीला बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मारहाण करणारा दामू अण्णा शिंदेसाठी मंत्री अतुल सावे पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावतात, त्याची अतिक्रमण वाचवतात. त्याने ज्या पद्धतीने मारहाण केली, तो व्यक्ती जीवंत आहे की नाही माहिती नाही. तो जिथे राहतो, तिथे नाही आणि त्याचे घर सुद्धा दामू अण्णा शिंदेने परस्पर विकले आहे. डोक्यात दगड घालणाऱ्या माणसावर साधी एनसी सुद्धा दाखल नाही. त्याच्यावर 307 दाखल केला पाहिजे आणि तो व्यक्ती मेला असेल तर 302 केला पाहिजे. परंतु, कोणताच गुन्हा दाखल नाही, कारण अतुल सावे यांचा सपोर्ट. हा व्हिडिओ फार जुना नाही, महिना दीड महिना पूर्वीचा आहे. या दामू अण्णा शिंदेने यापूर्वी देखील एक दोन वेळा त्या व्यक्तीला मारहाण केली होती, अशी माहिती दानवे यांनी दिली आहे. दामू अण्णा शिंदे कोण? अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार, मारहाण करणारी पांढऱ्या शर्टमधली व्यक्ती दामू अण्णा शिंदे आहेत. दामू अण्णा शिंदे हे माजी नगरसेवक आहेत. तसेच ते भाजप नेते व मंत्री अतुल सावे यांचे खास व्यक्ती, अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. अमानुष मारहाण, हत्या, धमक्या, अशा घटना सर्रास सुरू असून यात गृहखाते कुठेतरी कमी पडत आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर