ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नवऱ्याने भाजपविरोधात दंड थोपटताच बायकोने घर सोडले:नागपुरात पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत माजी महिला महापौरांनी सोडले पतीचे घर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिका निवडणुकीत नवऱ्याने भाजपविरोधात दंड थोपटताच माजी महापौर राहिलेल्या एका महिलेने आपले नांदते घर सोडल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पक्षनिष्ठेशी संबंधित या घटनेची पंचक्रोशीत खमंग चर्चा रंगली आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात अनेक पक्षांना विशेषतः भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या कथित उपऱ्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीमुळे नागपुरात एका उमेदवाराचा अनेक वर्षांचा संसारच संकटात सापडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. नेमका काय प्रकार घडला? त्याचे झाले असे की, भाजपने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहरनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामु्ळे माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यापुढे पक्षनिष्ठा व पतीची भूमिका यापैकी कुणाच्या मागे उभे राहायचे? असे धर्मसंकट उभे राहिले होते. त्यात त्यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत या निवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्चना डेहनकर यांनी यासाठी आपल्या पतीचे घर सोडत माहेरी भावाच्या घरी निघून गेल्यात. त्या आता महापालिका निवडणुकीत आपल्या पतीचा नव्हे तर भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून येतील. भाजपने अर्चना डेहनकर यांना 2009 ते 2012 पर्यंत नागपूरचे महापौरपद दिले होते. त्यामुळे पतीचे पक्षाच्या विरोधात जाणे आपल्याला मान्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अर्चना डेहनकर यांनी नवऱ्यावर दबाव निर्माण करण्यासाठी तथा स्वतःची पक्षनिष्ठा जपण्यासाठी नवऱ्याचे नांदते घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कामी येतात किंवा नाही हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 2 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. कोण आहेत अर्चना डेहनकर? अर्चना डेहनकर या नागपुरातील भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्या आहेत. त्यांनी 2009 ते 2012 पर्यंत नागपूरचे महापौरपद सांभाळले आहे. त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्षपदी सांभाळले आहे. त्या 1997 व 2007 साली नागपूर महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता महापालिका निवडणुकीत त्यांचे पती व भाजप नेते विनायक डेहनकर यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊन अर्चना यांनी थेट घर सोडल्यामुळे नागपूरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर