ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शिवरायांची कोनशिला पुन्हा बसवून वारशाचे जतन करावे:तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांचे नातू रवींद्र पाटील यांची भूमिका‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या पुढाकाराने सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांच्या पुढाकारातून झाला आहे, मात्र त्याची कोनशिला काढून टाकली आहे, ती पुन्हा बसवून ऐतिहासिक वारशाचे जतन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे. शिवस्वराज्य दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या उद्यानाच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून उद्यानाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून, उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्मिळ पूर्णाकृती पुतळा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सहज दिसावा यासाठी वृक्ष न तोडता त्यांना योग्य आकार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील शिवस्वराज्य दिनापर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या उभारणीशी संबंधित माहिती, त्या काळातील कार्यक्रमाच्या कोनशिलावर होत्या, मात्र ही कोनशिला गायब असल्याने पुन्हा ही कोनशिला नव्याने करून इतर ऐतिहासिक नोंदी पुन्हा जतन करून उद्यानात प्रदर्शित कराव्यात, सुशोभीकरणासोबतच इतिहासालाही उजाळा मिळाल्यास भावी पिढ्यांना या स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व समजण्यास मदत होईल, असे मत रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करताना उद्यानाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दि. २६ जानेवारी १९३२ मध्ये त्यांचे आजोबा असणारे तत्कालीन सोलापूर लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव आनंदराव उर्फ रावसाहेब पाटील (रा. बोरगाव) यांच्या पुढाकारातून उभा करण्यात आला होता. त्याचे अनावरणासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. १९३२ साली पुत‌ळा अनावरणप्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते अनावरण

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर