ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

प्रेषित हजरत मुहम्मद, हजरत आयशा अवमानप्रकरणी संताप:नाझीया इलाही खान यांना तत्काळ अटक करण्याची पोलिसाकडे मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे पुसद शहरातील मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद तसेच हजरत आयशा र.अ. यांच्या संदर्भात कथित अवमानकारक वक्तव्ये केल्याने नाझीया इलाही खान यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी मागणी पुसद येथील मुस्लिम समाजाने केली आहे. या मागणीचे निवेदन पुसद ठाणेदार सेवानंद वानखेडे यांना २६ जून रोजी देण्यात आले. निवेदनात नाझीया इलाही खान यांनी एका मुलाखतीमध्ये प्रेषित हजरत मुहम्मद व हजरत आयशा र.अ. यांच्या विषयी आक्षेपार्ह, अपमानास्पद विधाने केले आहे. या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी. भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील लागू कलमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून, या निवेदनावर सैय्यद इश्तियाक, सैय्यद जहीरोद्दीन, फिरोज खान, आकिब रिझवी, जाकीर काझी, नवाज अली, अब्दुल सिद्दीक, सैय्यद समीर, फैजान अहेमद, मोहम्मद सिद्दीक, सैय्यद समीर, सैय्यद हाशिर, हसनैन खान, शेख जुबेर, सैय्यद रहेबर, शाहरुख़ खान, शेख सद्दाम, अब्दुल अतीक, मोहम्मद अशफाक, सैय्यद शोएब यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करत पोलिस प्रशासनाने तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर