ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाना तात्काळ मदत करा  

693 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजय देरकर यांचे प्रशासनाला आदेश

सुरेश पाचभाई मारेगाव

अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत करा असे आदेश वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाला दिले आहे. प्रशासन कामाला लागले असून त्यांनी तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन मृतकाच्या नातेवाईकांची विचारपूस करून तेथील उपस्थित रुग्णालयाचे प्रमुख अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून उद्या सकाळी पोस्ट मार्टम करून द्यावे असे सांगितले आणि तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.

काल दि. 6 ऑगस्टला वीज पडून मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव ) येथील शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सदर घटनेत अनिल रमेश फरताडे वय अंदाजे 34 वर्षे रा.पांढरकवडा (पिसगाव ) ता.मारेगाव यांचा वीजअंगावर विज पडून मृत्यू झाला होता.

सदर घटनेची माहिती वणी विधानसभेचे आमदार संजूभाऊ दरेकर यांना मिळतात त्यांनी लगेच प्रशासनाला आदेश दिले.आदेश मिळतात लगेच प्रशासन ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल झाले. आणि मृतकाच्या  नातेवाईकांची विचारपूस केली व शासनातर्फे मिळणारी मदत तात्काळ वितरित करण्यात येईल असे आश्वासन मारेगाव तहसीलचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर