ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

जळका शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

25 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील जळका शिवारातील रोडलगत असलेल्या शेताजवळील नालीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ परचाके यांच्या शेताजवळील नालीत अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्षे असून त्याची उंची सुमारे ५.८ ,रंग गोरा, सरपातळ , केस काळ्या- पांढऱ्या रंगाचे,दाढी वाढलेली आहे. मृताच्या अंगात फिकट गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट,व राखटी रंगाचा हाफ पॅन्ट (बरमुळा) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे.या घटनेची माहिती जळका येथील पोलीस पाटील विजय मोघे यांनी मारेगाव पोलिसांना दिली.

अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, सदर व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास मारेगाव पोलीस ठाण्याशी तात्काळ 07237-237230 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सागर डानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी बुरकुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके तसेच पोलीस कर्मचारी नामदेव भटारकर, सागर दीपेवार व विकास खंडारे करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर