ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आकाशवाणीवर कु. स्वाती ठेंगणे यांची विशेष मुलाखत

626 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव आषाढी एकादशीचे औचित्य साधत मारेगाव येथील युवाकीर्तनकार, श्रीमद् भागवत व शिवमहापुराण कथा प्रवक्त्या, महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित तसेच आधार संस्था, मारेगावच्या संचालिका कु.स्वाती ठेंगणे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी केंद्र, यवतमाळ (१०२.७ मेगाहर्ट्झ) तसेच News on AIR ॲपवर होणार आहे.

या विशेष मुलाखतीत कु.ठेंगणे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासासह अध्यात्म, समाजसेवा, संस्कार, युवकांमधील सकारात्मक बदल आणि समाजप्रबोधनाच्या कार्याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. त्यांच्या अनुभवातून आणि विचारांतून युवकांना प्रेरणा व सकारात्मक दिशा मिळणार असल्याने या कार्यक्रमाबाबत श्रोत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.यासोबतच दि. २७ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६.३० वाजता त्यांच्या ‘मार्मिक चिंतन’ या विशेष मालिकेचेही प्रसारण करण्यात येणार आहे.

या मालिकेत ‘महाराष्ट्राची वारी – चालत बोलत भक्तीचं विद्यापीठ’, ‘शिक्षण आणि संस्कार – यशस्वी जीवनाचा पाया’, ‘जिद्द – यशाकडे नेणारी वाट’ आणि ‘जाळ्यात अडकलेली तरुणाई’ या समाजप्रबोधनपर विषयांवर त्यांनी प्रभावी चिंतन मांडले आहे.
मुलाखतीदरम्यान “चिंतन म्हणजे फक्त ऐकणे नाही, तर स्वतःमध्ये डोकावण्याची एक सुंदर संधी आहे,” असा संदेश देत त्यांनी आत्मपरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमासाठी आकाशवाणी केंद्र, यवतमाळच्या आर.जे. प्रज्ञा निळकरी तसेच संपूर्ण आकाशवाणी परिवाराचे कु. स्वाती ठेंगणे यांनी आभार मानले असून, नागरिकांनी आकाशवाणी केंद्र, यवतमाळ (१०२.७ मेगाहर्ट्झ) तसेच News on AIR ॲपवर ही विशेष मुलाखत आणि ‘मार्मिक चिंतन’ मालिका आवर्जून ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर