ब्रेकिंग न्यूज
⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं?
SP News Maregaon

रेतीची अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर व जेसीबी जप्त

113 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महसूल विभागाची धडाकेबाज  कारवाई

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव: तालुक्यातील रेती घाटातुन अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरु आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहे.परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे.

अशातच आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्री  २: ३० वाजताच्या दरम्यान महसूल प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणारा एक  ट्रॅक्टर व जेसीबी जप्त केली आहे.या धडाकेबाज कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यात होत असलेली रेतीची अवैध वाहतूक ही प्रशासनाला आव्हान ठरलेली आहे.अवैध रेतीची रात्रदिवस वाहतूक सुरु असल्याच्या माहितीवरून मारेगाव तहसीलदार यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोज मंगळवारच्या मध्यरात्री २: ३० वाजताच्या सुमारास दापोरा येथील पुलाजवळ अवैधरित्या जेसीबी मशीनद्वारे ट्रॅक्टर मध्ये अवैध रेती उत्खनन करून ती ट्रॅक्टरमध्ये भरीत असताना ट्रॅक्टर व जेसीबी मशीन पकडण्यात आली.

जेसीबी मालक महादापेठ येथील असून टॅक्टर मालक हा चिचमंडळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.सदर दोन्ही वाहन महसूल प्रशासनाने पकडले असून सदर ट्रॅक्टर व जेसिबी मारेगाव येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे.सदरची कारवाई मारेगाव येथील तहसीलदार उत्तम निलावाड,सहाय्यक तलाठी कुडमेथे,सोयाम, मडावी यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर