ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश

59 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांची धडाकेबाज रॅली; तहसीलदारांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगाव शहरात सोमवारी सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हजारो नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण शहर घोषणांनी दणाणून सोडले.

कॉकरोज जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी एकजुटीचे दर्शन घडवले.

राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून प्रारंभ झालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर धडकली. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचारातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी वक्त्यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “विद्यार्थ्यांवरील अत्याचार हा लोकशाहीच्या मूल्यांवर थेट आघात असून तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

रॅलीत नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, मराठा सेवा संघाचे अनंत मांडवकर, काँग्रेस नेत्या अरुणा खंडाळकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रफुल आदे, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद लडके, प्रकाश कोल्हे, वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर मुन, संजय जिवणे, काँग्रेसचे नगरसेवक आकाश बदकी, नंदेश्वर आसुटकर, अरविंद वखनोर, शिवसेना (उबाठा)चे सचिन पचारे, मनसेचे चांद बहादे,

शेख नबी, आकाश खामनकर, अभय चौधरी, अंकुश माफुर, जिजाऊ ब्रिगेडच्या स्वाती बोढे, प्रतिभा डाखरे, मनसेच्या नगरसेविका अंजुमन नबी शेख, रेखा हेपट यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.संपूर्ण रॅली शांततापूर्ण वातावरणात पार पडली. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकवटलेल्या या जनआक्रोशाने मारेगाव शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर